Pune APMC
Pune APMC Agrowon

Pune APMC Update : पुणे बाजार समिती सकाळी दहा वाजता बंद

APMC News : बाजार घटकांना विश्‍वासात न घेता हे परिपत्रक काढल्याचे बाजार घटकांनी सांगितले. तर अननुभवी संचालक मंडळाचा फोलपणा उघड झाला आहे.
Published on

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि सचिवांनी सकाळी १० वाजल्यानंतर खरेदीदार ग्राहक येत नसल्याचा जावईशोध लावत, १० वाजल्यानंतर फळेभाजीपाला विभाग आणि दोननंतर कांदा-बटाटा विभागातील व्यवहार बंद करण्याचा फतवा काढल्याने अडत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजार घटकांना विश्‍वासात न घेता हे परिपत्रक काढल्याचे बाजार घटकांनी सांगितले. तर अननुभवी संचालक मंडळाचा फोलपणा उघड झाला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशातील विविध राज्यांतून भाजीपाल्याची आवक होत असते. अनेक वेळा वाहने उशिराने दाखल होत असतात, अशा परिस्थितीमध्ये बाजार १० वाजता बंद करणे हे बाजार समितीच्या उलाढालीवर आणि बाजार घटकांवर अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया आडत्यांनी व्यक्त केली आहे. तर प्रसंगी या निर्णयाविरोधात बाजार बंद ठेवण्याची भूमिका घेणार असल्याचे व्यापारी गटाचे संचालक असलेल्या गणेश घुले आणि बापू भोसले गटाच्या अडत्यांनी सांगितले.

Pune APMC
Pune APMC Latest News : पुणे बाजार समितीच्या सभापतिपदी दिलीप काळभोर

बाजार समितीमध्ये कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आदी विविध राज्यांमधून नाशीवंत आणि अतिनाशीवंत मालाची आवक होत असते. या वाहनांचा प्रवास हा १२ ते २० तासांचा असतो. अनेक वेळी ही वाहने बाजार आवारात दाखल होण्यास विलंब होतो.

तर अनेक वेळा बाजार आवारातील वाहतूक कोंडीमुळे देखील वाहने बाजार आवारात संबंधित अडत्यांच्या गाळ्यावर येऊन, तो शेतीमाल खाली उतरविणे आणि त्याची विक्री होण्यास विलंब होतो. अशा परिस्थितीत फळे भाजीपाला विभाग सकाळी १० वाजता बंद करणे हे सर्वच घटकांवर अन्यायकारक असल्याचे विविध अडत्यांनी सांगितले.

Pune APMC
Pune APMC : पुणे बाजार समितीमध्ये बदल्यांचा हंगाम सुरू

फळेभाजीपाला नियमनमुक्तीमुळे एकीकडे बाजार समितीमधील फळे भाजीपाल्यांची आवक कमी होत असल्याचे ओरड अडत्यांकडून होत आहे. आवक कमी होऊन बाजार समितीच्या उत्पन्न घटल्याचे सातत्याने बोलले जात आहे.

तर दुसरीकडे बाजार आवारातील भाजीपाल्याची आवक वाढी बरोबरच बाजारातील उलाढाल वाढीसाठी संचालक मंडळाने प्रयत्न करणे गरजेचे असताना, सकाळी १० वाजता बाजार बंद करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार असल्याची भावना ज्येष्ठ अडतदारांनी व्यक्त केली आहे.

परिपत्रक रद्द न केल्यास आवक, उत्पन्न घटणार

सकाळी १० वाजता बाजार बंद करण्याचे परिपत्रक रद्द न केल्यास परराज्यांतून होणारी आवक कमी होऊन, बाजार आवारातील उलाढालीवर विपरीत परिणाम होण्याचा धोका अनेक अडत्यांनी व्यक्त केला. पणन संचालक एकीकडे बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना करत असताना, १० वाजता बाजार बंदचा फतवा हा पायावर कुऱ्हाड मारण्याचा प्रकार असल्याचे ज्येष्ठ अडत्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com