Cow Milk Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Katraj Milk : दूध उत्पादकांना देणार प्रति लिटर एक रुपयाचा फरक

Dairy Industry : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (कात्रज डेअरी) जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर १ रुपयाचा फरक दिला जाणार आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (कात्रज डेअरी) जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर १ रुपयाचा फरक दिला जाणार आहे. ‘कात्रज डेअरी’च्या बुधवारी (ता. २७) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

हा फरक येत्या दिवाळीपूर्वी वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा कात्रज डेअरीचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी या वेळी बोलताना केली. कात्रज डेअरीला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५१ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. हा नफा होण्यामागे कात्रज डेअरीला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे.

त्यामुळे या शेतकऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून एक रुपयाचा फरक देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. या फरकापोटी ६ कोटी ७३ लाख रुपयांचे वाटप केले जाणार आहे. संघाचे अध्यक्ष पासलकर यांनी या सभेत दूध संघाच्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा जाहीर केला.

या वेळी दूध उत्पादकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देत, त्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच जिल्ह्यातील १६ दूध संस्थांना आदर्श दूध संस्था पुरस्कार, तर पशुखाद्याची सर्वाधिक विक्री करणाऱ्या ३ दूध संस्थांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

प्रत्येकी रोख ११ हजार रुपये, प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या सभेला दूध संघाचे आजी, माजी संचालक, दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष भाऊ देवाडे यांनी आभार मानले.

जिल्हा दूध संघाने सातत्याने उत्पादकांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. यानुसार दूध संघ नेहमीच शेतकऱ्यांना अधिकाधिक खरेदी दर देण्यासाठी प्रयत्नशील राहिला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या काही अडचणी असल्या तरी, त्या सोडविण्यात येतील. यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध संघास सहकार्य करावे.
- भगवान पासलकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा दूध संघ (कात्रज दूध)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT