Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : धुळ्यात हंगामातील नीचांकी ५.५ अंश तापमानाची नोंद

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे आजपासून (ता. ११) राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागरातील (Bay Of Bengal) वादळी (Cyclone) प्रणालीच्या प्रभावामुळे आजपासून (ता. ११) राज्यात वादळी पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. यातच किमान तापमानातील घट कायम असून, शनिवारी (ता. १०) धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या आवारात यंदाच्या हंगामातील नीचांकी ५.५ अंश तापमानाची नोंद झाली.

उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कायम असल्याने महाराष्ट्रातील धुळे आणि मध्य प्रदेशातील नवगाव येथे शनिवारी (ता. १०) देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यासह निफाड, औरंगाबाद, जळगाव, परभणी (कृषी विद्यापीठ), पुणे येथे किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली होता. तर रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३४.२ अंश तापमान नोंदले गेले.

उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ढगाळ वातावरण झाले आहे. आज (ता. ११) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

चक्रीवादळ निवळले

बंगालच्या उपसागरातील ‘मनडूस’ चक्रीवादळ शनिवारी (ता. १०) पहाटे पूर्व किनाऱ्याला धडकले. जमिनीवर येताच या वादळाची तीव्रता निवळली आहे. १० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे : धुळे ५.५, निफाड ६.३, औरंगाबाद ७.५, जळगाव ८.५, परभणी (कृषी विद्यापीठ) ८.५, पुणे ८.९.

वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा

कोकण : सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्र : सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर. विदर्भ : वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Avliya Avinash Success Story: विनाशकारी कोविड : अवलिया अविनाश

Tomato Bacterial Wilt: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगावर काय उपाय करावा?

Choose Right Tree: कोणता वृक्ष आणि कुठे लावावा?

Biological Crop Disease Control: केवडा रोग कार्यरत होण्यास वाव, जैविक नियंत्रणावर हवा भर

Weather Stations: स्वयंचलित हवामान केंद्रांशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई : मित्तल

SCROLL FOR NEXT