Devgad Hapus  Agrowon
ताज्या बातम्या

Devgad Hapus Mango : देवगड हापूस मुंबईत दाखल

अस्सल चवीची ख्याती असलेल्या देवगड हापूस आंब्याचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आगमन झाले आहे. राजापूर येथील गजानन शेटे यांच्या बागेतील मिनिस्टर ब्रँडचा हा आंबा आला आहे. पेटीचा दर प्रतीनुसार सहा हजार ते १२ हजार रुपये आहे.

Team Agrowon

Mango Season मुंबई : अस्सल चवीची ख्याती असलेल्या देवगड हापूस आंब्याचे (Devgad Hapus Mango) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Mumbai APMC) आगमन झाले आहे. राजापूर येथील गजानन शेटे यांच्या बागेतील मिनिस्टर ब्रँडचा हा आंबा आला आहे. पेटीचा दर (Hapus Rate) प्रतीनुसार सहा हजार ते १२ हजार रुपये आहे.

यंदा हवामानातील बदलाचा मोठा परिणाम आंब्याच्या मोहरावर झाल्याने ऐन हंगामात म्हणजे एप्रिलमध्ये आंब्याचा तुटवडा जाणवणार असल्याचा अंदाज बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सध्या देवगड हापूसचे आगमन बाजारात झाले असले तरी जास्त दरामुळे तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही. १५ फेब्रुवारीपासून आंबा जास्त प्रमाणात बाजारात येईल, असा अंदाज आहे. यंदा उशिरा आलेली थंडी आणि धुक्यामुळे आंब्याच्या झाडांना उशिरा मोहर आला.

पहिल्या मोहराचे आंबे काढणीला आले आहेत. जानेवारीत जो मोहर येणे अपेक्षित होते, तो मोहर आता फेब्रुवारीत येत आहे. परिणामी एप्रिलमध्ये काढणीला येणारा आंबा मे महिन्यांत काढणीला येण्याची शक्यता आहे.

उशिरा आलेल्या मोहराचा परिणाम आखाती देशांमध्ये रमजान महिन्यात आंबा निर्यातीचे नियोजन असलेल्या व्यापाऱ्यांना सहन करावा लागणार आहे. यंदा २५ मार्च ते २५ एप्रिल दरम्यान रमजान महिना आहे. या दरम्यान आंब्याला मोठी मागणी असते.

मात्र, ही मागणी पूर्ण करता येणार नाही, असेही व्यापारी सांगत आहेत. एरवी मार्च एप्रिल आणि मे महिन्यात दिवसाला किमान ५० ते ६० हजार पेटी आंबा येतो.

यंदा हे प्रमाण एप्रिल महिन्यात १० ते १५ हजार पेट्यांचे राहील, असेही व्यापाऱ्यांना वाटते. सध्या आलेला देवगड हापूस तीन हजार रुपये डझनाने विक्री होत आहे.

यंदाच्या हंगामात मे महिन्यात हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल. उशिरा आलेल्या मोहरामुळे एप्रिल महिन्यात कमी आंबा येईल. शिवाय, याचा परिणाम निर्यातीवरही होईल.

- संजय पानसरे, संचालक, मुंबई बाजार समिती.

कलिंगड, द्राक्षांची मोठी आवक

सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगड, द्राक्षांची मोठी आवक आहे. दिवसाला ५५ वाहनांतून पाच हजार क्विंटलहून अधिक कलिंगडासह द्राक्षे येत आहेत. मात्र, मागणीअभावी दर कमी आहे. क्विंटलचा दर किमान ७०० तर कमाल १५०० रुपये मिळत आहे. तर ८५० क्विंटलहून अधिक द्राक्षांची आवक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scheme : बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा अर्जासाठी अंतिम मुदत

Crop Insurance Payment : विमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात

NAFED Onion Scam : कांदा उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोरदार कमबॅक

Kharif Sowing : सोयाबीन, सूर्यफूल क्षेत्रात घट

SCROLL FOR NEXT