
रोहा ः हवामान बदलाचा फटका आंबा उत्पादकांना (Mango Producer) बसण्याची शक्यता आहे. अद्याप मोहर (mango Blossom) न आल्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Nisarg) अनेक ठिकाणी आंब्याची झाडे उन्मळून पडल्याने बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते.
मात्र यातून जी झाडे वाचली, त्यांना अद्याप मोहोन आलेला नाही. ज्या झाडांना मोहर आला, तोही गळून पडल्याचे बागायतदार सांगतात.
रोहे तालुक्यातील सुतारवाडी, जामगाव, दुरटोली, ढोकलेवाडी, गौळवाडी (विजयनगर) कामथ, सावरवाडी, येरळ, कुडली, अंबिवली, नारायणगाव, तांबडी, वीरजोली इत्यादी ठिकाणी फार्महाऊस आहेत.
या फार्महाऊसच्या परिसरात जास्तीत जास्त आंब्याच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. मोहर न आल्यामुळे फार्म हाऊस मालकांनाही चिंता लागली आहे. या विभागातील आंबे मोठ्या प्रमाणावर परदेशात किंवा अन्य राज्यात विक्रीसाठी जातात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.