Seed Demand Agrowon
ताज्या बातम्या

Seed Demand : साताऱ्यात रब्बीसाठी ३२ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

Rabi Season : जिल्ह्यात खरीप हंगाम पावसाने पाठ फिरवल्याने हातचा जाण्याची परिस्थिती आहे. चाऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. याही परिस्थितीत रब्बी हंगामाची शेतकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे.

Team Agrowon

Satara News : ‘‘जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३२ हजार ४१९ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. तसेच खरीप हंगामातील व या हंगामातील ६० हजार ८५० टन खते उपलब्ध आहेत,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात खरीप हंगाम पावसाने पाठ फिरवल्याने हातचा जाण्याची परिस्थिती आहे. चाऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. याही परिस्थितीत रब्बी हंगामाची शेतकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे.

जिल्ह्यात रब्बीत दोन लाख ४५ हजार ३०० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्या दृष्टीने बियाणे व खतांचे नियोजन करण्यात आले आहे. माण, खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा या दुष्काळी तालुक्‍यांचा रब्बी हा प्रमुख हंगाम आहे.

त्यामुळे या तालुक्‍यात सर्वाधिक पेरणी होईल. रब्बी सर्वाधिक गहू पिकांची पेरणी होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे सर्वाधिक गव्हाच्या बियाण्याची १५ हजार ७५० क्विंटल, त्यानंतर ज्वारीच्या २९५० क्विंटल,हरभऱ्याच्या ८९१० क्विंटल बियाण्यांची मागणी केलेली आहे. याशिवाय एक लाख ४५ हजार ५०० टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे.

प्रमुख खते व त्याची मंजुरी (टन)

खते मागणी

युरिया ५५०००

डीएपी १४०००

एमओपी १३०००

एनपीके ५०५००

एसएसपी १२०००

इतर खते १०००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT