Seed Demand In Kolhapur : कोल्हापुरात बियाण्यांना किरकोळ मागणी

Kharif Season : खरीप हंगाम तोंडावर आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे, खते, औषधे हाउसफुल्ल केली आहेत; परंतु खरेदीसाठी शेतकरीच येईनासे झाले आहेत.
Seed Demand
Seed DemandAgrowon
Published on
Updated on

Gadhinglaj News : खरीप हंगाम तोंडावर आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे, खते, औषधे हाउसफुल्ल केली आहेत; परंतु खरेदीसाठी शेतकरीच येईनासे झाले आहेत.

पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरीच पेरणीबाबत संभ्रमात आहेत. दुकानदार मात्र त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ धूळवाफ पेरणी आणि रोपे तयार करण्यासाठी भात बियाण्यांची किरकोळ मागणी आहे.

मे महिना संपला तरी अद्याप कडक ऊन आहे. अधून मधून ढगाळ वातावरण होत असले तरी वळीव पाऊस पडत नाही. आता शेतकरी मॉन्सूनपूर्व पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Seed Demand
Mahabeej Kharif Seed Production : ‘महाबीज’चा २४ हजार हेक्टरवर खरीप बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित

पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्‍यांकडून सोयाबीन टोकण्याची तयारी सुरू झाली आहे. महागावच्या पट्ट्यात धूळवाफ पेरण्यांना गती आली आहे; मात्र इतरत्र शेती तयार करून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

तालुक्यात ऊस वगळता २८ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी होते. सोयाबीन, भात, भुईमूग, मिरची या प्रमुख पिकांचे उत्पादन घेतले जाते. शहरासह तालुक्यात ७५ कृषी सेवा केंद्रे आहेत. आगामी खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते, औषधांचा साठा दुकानदारांनी केला आहे.

मे महिन्यातील शेवटच्या टप्प्यात धूळवाफ पेरण्या होतात. नेसरी भागातील बहुतांश शेतकरी भाताची रोपे करतात. असे शेतकरीच सध्या केवळ भात बियाणे खरेदी करीत आहेत.

यंदाचा पावसाळा बेभरवशाचा असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पावसाचे वातावरण नसल्याने आताच बियाणे खरेदी करून काय करायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्‍यांचा आहे.

मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

पावसाळ्यात भात, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्‍यांनी आपली शेती सज्ज ठेवली आहे. बहुतांशी कामे आवरती घेतली असून किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत.

नांगरट, सपाटीकरण, सडे, खोडवी वेचण्याची कामे करून शेतजमीन तयार केली आहे. बांधबंदिस्तीही केली आहे. चांगला ओलावा निर्माण होईल, असा पाऊस झाल्यानंतरच बियाणे खरेदीसाठी गर्दी वाढेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com