Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : ओला दुष्काळ जाहीर करा

टीम ॲग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. शेकडो एकर जमिनी खरडून गेली. कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी, आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatna) केली. बाळापूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना याबाबतचे निवेदन पाठवण्यात आले.

शेतमजुरांना चिंतामुक्त करून स्वाभिमानाने जगता यावे यासाठी सरकारने राज्यात स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करावे, सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर शेतमजुरांना दरमहा ४ हजार रुपये मानधन द्यावे,

ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशा विविध मागण्या जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात करण्यात आली. २१ ऑक्टोबरला शेतकरी, शेतमजुरांचा बाळापूर तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्याचाही इशारा देण्यात आला.

संघटनेच्या मागण्या

-विमा कंपनीने विनाअट पीकविमा द्यावा.

-जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई.

- राज्यात स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करा.

- सन्मान निधी योजनेप्रमाणे शेतमजुरांना दरमहा ४ हजार रुपये मानधन.

- जिल्हा बँकेने रूपांतरित केलेल्या पीककर्ज खात्यांची कर्जमाफी त्यांच्या खात्यात जमा करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Procurement : तेलंगणा सरकारने केलं भातासाठी प्रति क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर; महाराष्ट्रातील भात उत्पादक मात्र हवालदिल

Farmers Protest : पंजाब-हरियाणातील रेल्वे रोको आंदोलन स्थगित

Milk Production : दूध उत्पादनाचे अर्थशास्त्र मांडा...

Kolhapur Rain : कोल्हापुरात वळवाच्या पावसाने भाजीपाला, आंबा बागांना फटका

Animal Disease : जनावरांतील चयापचयाचे आजार

SCROLL FOR NEXT