Kisan Long March Agrowon
ताज्या बातम्या

Kisan Long March : शेतकऱ्यांचं लाल वादळ माघारी फिरणार ; आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Team Agrowon

Kisan Long March Update आपल्या विविध मागण्यांसाठी निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित करण्यात आला आहे. किसान सभेचे नेते माजी आमदार जे. पी. गावित (J. P. Gavit) ही माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या आश्वासनानंतर शेतकरी लाँग मार्च (Farmer Long March) स्थगित करण्यात आला आहे.

नाशिकहून मुबंईच्या दिशेने निघालेला शेतकरी लाँग मार्च अखेर स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत (Devendra Fadanavis) झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते.

किसान सभेच्या बारा जणांच्या शिष्टमंडळाची गुरूवारी (ता. १६) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या.

तर काही मागण्यांसदर्भात एक समितीही गठित करण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. १७) मुख्यमंत्री शिंदे यांनी शेकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात विधानसभेत निवेदन दिले.

तत्पूर्वी आंदोलन मागे घेण्यासंदर्भातील शासकीय प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी शेतकरी थांबलेल्या आंदोलनस्थळी जाणार असून यावेळी किसान सभेचे नेते गावितही त्यांच्यासोबत असणार आहेत.

त्यानंतर अधिकृतरित्या हे आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात येणार आहे. यावेळी गावित हे शेतकऱ्यांना संबोधित करतील. त्यामुळे आजच शेतकरी आपल्या घरी रवाना होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी बस, रेल्वेची व्यवस्था

शेतकरी आंदोलनावर सकारात्मक मार्ग निघाल्यानंतर शेतकरी लाँग मार्च स्थगित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून १० बसेस तर ठाणे महानगर पालिकेकडून पाच बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच रेल्वे प्रशासनाकडून दोन रेल्वे गाड्याही तयार ठेवण्यात आल्या आहेत. वाशिंद रेल्वे स्थानकावरून या रेल्वेगाड्या नाशिकच्या दिशेने रवाना होणार आहेत. तर एसटी बसेस वाशिंदच्या मैदानावरूनच रवाना होणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्या कालच पूर्ण झाल्या होत्या. मात्र, त्यांची अंमलबजावणी ही आजपासून होणार आहे. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी आज आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारी हजारोंच्या संख्यने मुंबईच्या दिशेने येणारे शेतकीर आंदोलन आता स्थगित झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Drill Subsidy: हिंगणघाट बाजार समिती देणार अनुदानावर पेरणी यंत्र

Farmer Insurance App Issue: ॲप, टोल फ्री नंबरवर तक्रारीची नोंद होईना!

Avocado Farming Success: दिवे येथे अ‍ॅव्होकॅडो फळपीक उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

Farmer Death: कसमादे पट्ट्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Sugar Industry Growth: साखर उद्योगाला चालना मिळणार

SCROLL FOR NEXT