Onion Subsidy : किसान सभेच्या आंदोलकांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मांडल्या पटलावर; कांद्याच्या अनुदानात ५० रुपयांची वाढ

लॉग मार्चमधील आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी (ता.१७) एकनाथ शिंदे यांनी सभागृहाच्या पटलावर मागण्या मांडल्या.
Kisan Long March
Kisan Long MarchAgrowon

Eknath Shinde : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ३०० रुपयांमध्ये ५० रुपयांची वाढ करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

किसान सभा शिष्टमंडळाच्या विविध मागण्या मान्य केल्या आहेत. लॉग मार्चमधील आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी (ता.१७) एकनाथ शिंदे यांनी सभागृहाच्या पटलावर मागण्या मांडल्या.

आंदोलकांच्या विविध मागण्याची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच मागण्याबाबत एक समिती गठित केली जाणार आहे. ही समिती एका महिन्यात आपल्या शिफारशी सादर करतील.

या समितीमध्ये आंदोलकांच्या वतीने माजी आमदार जे पी गावीत आणि आमदार विनोद निकोले यांमकहा समावेश असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मागण्या मान्य झाल्याचे निवेदन द्यावे, अन्यथा मोर्चा मागे घेणार नाही, अशी मागणी किसान सभेने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर केली होती.

दरम्यान, एकूण १४ मागण्या मान्य करत त्याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

देवस्थानाची जमीन, वन जमिनीवरील अतिक्रमणे, वनहक्क, अंगणवाडी सेविका आदि मागण्याही मांडल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, "शेतकऱ्यांशी बैठकीत सकरात्मक चर्चा झाली. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे आम्ही त्या स्वीकारत आहोत. आता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे."

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com