Dadar Jowar Agrowon
ताज्या बातम्या

Dadar Jowar : दादर ज्वारी पीक निसवू लागले

खानदेशातील हुकमी कोरडवाहू रब्बी पीक म्हणून ओळख असलेल्या दादर ज्वारीचे पीक जोमात आहे. पीक सर्वत्र निसवले आहे. त्याची वाढही थंडीमुळे जोमात आहे.

Team Agrowon

जळगाव ः खानदेशातील हुकमी कोरडवाहू रब्बी पीक (Rabi Jowar) म्हणून ओळख असलेल्या दादर ज्वारीचे (Rabi Jowar) पीक जोमात आहे. पीक सर्वत्र निसवले आहे. त्याची वाढही थंडीमुळे (Cold Weather) जोमात आहे. दादर ज्वारीस थंड व निरभ्र वातावरण हवे असते. खानदेशात यंदा दिवाळीलाच अनेकांनी कोरडवाहू दादरची पेरणी (Dadar Jowar Sowing) पूर्ण केली.

काही शेतकऱ्यांनी दिवाळीनंतरही पेरणी केली. वेळेत पेरणी केलेल्या दादर ज्वारी पिकात १० दिवसांपूर्वीच निसवण झाली आहे. त्यात दाणे पक्व होत आहेत. दादर ज्वारीची खानदेशात यंदा सुमारे ३५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

हरभऱ्यानंतर दादर ज्वारीची पेरणी केली जाते. तसेच दादर ज्वारी व संकरित किंवा बागायती क्षेत्रातील इतर ज्वारीची मिळून सुमारे ६५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

हरभऱ्यानंतर ज्वारीची खानदेशात पेरणी केली जाते. तापी, गिरणा, अनेर, पांझरा नदीकाठच्या काळ्या कसदार जमिनीत ही पेरणी उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांखालील क्षेत्र रिकामे झाल्यानंतर करण्यात आली होती. यंदा पाऊसमान चांगले असल्याने ओलावा चांगला होता. त्यात पीक जोमात उगवले व त्याची वाढही चांगली झाली.

मध्यंतरी ढगाळ वातावरण राहिल्याने पिकाची हवी तशी वाढ दिसत नव्हती. परंतु जशी थंडी वाढली, तशी पिकाची वाढही जोमात दिसू लागली आहे. काही शेतकऱ्यांनी दादर ज्वारीचे एकदाही सिंचन केलेले नाही. तर काही शेतकऱ्यांनी एकदा सिंचन केले आहे. तापी नदीकाठी कोरडवाहू दादर ज्वारी अधिक आहे.

निसवलेल्या पिकात पक्ष्यांपासून संरक्षणासाठी राखण करावी लागत आहे. पिकाची वाढ १३ ते १५ फूटांपर्यंत आहे. त्यावर कणसाचे वजन आहे. हवा आल्यास पीक आडवे होण्याची शक्यताही असते.

दादर ज्वारीचे दर मागील वर्षी प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांपर्यंत होते. तसेच कडब्यासही प्रतिशेकडा तीन ते साडेतीन हजार रुपयांचा दर होता. यामुळे यंदाही दर टिकून राहतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दादर ज्वारीची पेरणी जळगावात चोपडा, जळगाव, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव या भागांत अधिक आहे.

पीक संरक्षणासाठी रात्रीचे जागरण

धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा तालुक्यात दादर ज्वारी पीक अधिक आहे. मागील हंगामात एकरी आठ ते १० क्विंटल उत्पादन हाती आले होते. यंदाही चांगले उत्पादन शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.

तापी, गिरणा, अनेर नदीच्या क्षेत्रांत पिकाची वन्यप्राणी हानी करीत आहेत. त्यामुळे नुकसान होत असून, शेतकऱ्यांना रात्री पिकाच्या संरक्षणासाठी जावे लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo 8th Installment : नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्यासाठी निधी मंजूर; शासन निर्णय जारी

MRGS Scheme: ‘एमआरजीएस’ योजनेत पाच कोटींच्या निधीवर प्रश्नचिन्ह

Freedom Of Religion Bill: धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ विधानसभेत सादर; मुस्लिम समाज लक्ष्य असल्याचा विरोधकांचा दावा

Sugar Factory Action: सोलापूर जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांवर जप्तीचा प्रस्ताव

Millet Farming: कुरुलमध्ये राळा, वरई, भगरीचा प्रयोग,संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांकडून पाहणी

SCROLL FOR NEXT