Union Cabinet Decisions: केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम २०२६-२७ साठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (स्फुरद आणि पालाशयुक्त) खतांच्या पोषक तत्त्व आधारित अनुदान (एनबीएस) दरांना मंजुरी दिली. या खतांच्या अनुदानापोटी ६२,३७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम नुकत्याच संपलेल्या खरिपाच्या तुलनेत ५० टक्क्यांनी अधिक आहे..तसेच ही रक्कम रब्बी हंगाम २०२५-२६ मधील अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा सुमारे २४,४१७.७३ कोटी रुपयांनी अधिक आहे. गेल्या रब्बीत यासाठी ३७,९५२.२९ कोटी रुपये तरतूद केली होती. पश्चिम आशियातील तणाव काही प्रमाणात कमी झाला असतानाही युरिया वगळता इतर रासायनिक खतांचे दर चढेच राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना डीएपी आणि इतर खते अनुदानित, परवडणाऱ्या दरात मिळावीत हा यामागील उद्देश असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. .Fertilizer Black Marketing : शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार! अनुदानित खतांच्या काळाबाजाराला प्रशासनाने लावला लगाम.डीएपी (DAP) आणि एनपीकेएस (NPKS) यांच्यासह फॉस्फेट व पालाशयुक्त खतांसाठी अनुदान रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये मंजूर केलेल्या दरांनुसार मिळत राहील. या अनुदानाचा लाभ १ ऑक्टोबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ कालावधीत मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना ही खते कोणत्याही अडचणीविना परवडणाऱ्या दरात मिळण्यास मदत होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे..FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग.दरम्यान, डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) चा दर प्रति ५० किलोच्या पिशवीसाठी १,३५० रुपये इतका पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. या निर्णयामुळे देशांतर्गत खत उत्पादनाला चालना मिळण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, असे त्यांनी सांगितले..शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली पोषकद्रव्ये परवडणाऱ्या दरात सहजपण उपलब्ध व्हावीत, यासाठी डीएपी आणि एनपीकेएस (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, सल्फर) श्रेणींसह पी आणि के खतांवरील अनुदान रब्बी २०२६-२७ हंगामासाठी मंजूर दरांनुसार मिळणार आहे. .शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते मिळतील- पंतप्रधान मोदीदेशभरातील अन्नदात्यांसाठी नेहमीच आमचे पहिले प्राधान्य राहिले आहे. जगात कठीण परिस्थिती असतानाही आम्ही त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यासाठी शेतकरी हिताच्या दृष्टीने पाऊल उचलत रब्बी हंगाम २०२६-२७ साठी खतांवरील पोषक तत्त्व आधारित अनुदानास मंजुरी दिली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलत्या दरांचा आपल्या शेतकरी बांधवांवर कोणताही भार पडणार नाही, तसेच त्यांना परवडणाऱ्या आणि योग्य दरात खते मिळत राहतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.