Satej patil agrowon
ताज्या बातम्या

Satej patil : सतेज पाटील यांच्या कारखान्याने एफ.आर.पी. पेक्षा जादा दर दिला पण किती?

Sugarcane Rate : आमदार सतेज पाटील यांच्या डी. वाय. पाटील कारखान्याने एफ.आर.पी पेक्षा ५० रुपये जादा दर देण्याची घोषणा केली.

sandeep Shirguppe

D. Y. Patil sugar factory : आमदार सतेज पाटील यांच्या डी. वाय. पाटील कारखान्याने एफ.आर.पी पेक्षा ५० रुपये जादा दर देण्याची घोषणा केली. काल (ता.२२) पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सतेज पाटील यांनी घोषणा केली.

अनेक वर्षांपासून एफआरपीपेक्षा जादा दर दिला आहे. २०२२-२३ मध्ये गाळपासाठी आलेल्या उसास प्रतिटन ५० रुपये दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी देणार असल्याची घोषणा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केली.

ते म्हणाले, 'उपपदार्थ प्रकल्पांच्या माध्यमातून एफआरपीपेक्षा जादा दर देणे शक्य होत आहे. २०२२-२३ मध्ये एफआरपी २९०३ रुपये होती. मात्र गाळपास आलेल्या उसास ३ हजारांचा पहिला हप्ता आदा केला असून अंतिम हप्ता ५० रुपयाप्रमाणे एकूण ऊस बिल ३,०५० इतके होते. या हंगामात एफआरपीपेक्षा १४७ रुपये जादा दर होत आहे.

ऊस विकासाच्या माध्यमातून बांधावर जाऊन त्यांना मदतीची भूमिका असून सभासदांनी उपलब्ध क्षेत्रात कमी खर्चात जादा उत्पन्न घेणे गरजेचे आहे. आगामी हंगामात ५.५० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी ऊस गळीतास देण्याचे आवाहन केले. सर्व विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली. विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी केले.

ऊस विकास योजनांचा आढावा ऊसविकास अधिकारी सुनील पाटील यांनी घेतला. सभेस व्हा. चेअरमन बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, खंडेराव घाटगे, दत्तात्रय पाटणकर, चंद्रकांत खानविलकर, बजरंग पाटील, प्रभाकर तावडे, रवींद्र पाटील, संजय पडवळ, महादेव पडवळ.

धैर्यशील घाटगे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, तानाजी लांडगे, उदय देसाई, पांडुरंग पडवळ, रामा जाधव, सभासद, तोडणी वाहतूक कंत्राटदार, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचलन एकनाथ लोखंडे तर सचिव नंदू पाटील यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT