Satej Patil vs Amal Mahadik : गोकुळ झालं आता राजाराम कारखान्यात होणार राडा? सतेज पाटलांनी केला महाडिकांवर आरोप

MLA Satej Patil : आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या घराण्यातील नेत्यांकडून पुन्हा शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
Satej Patil vs Amal Mahadik
Satej Patil vs Amal Mahadikagrowon
Published on
Updated on

Kolhapur rajaram sahkari sakhar karkhana : कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १२७४ सभासद रद्द झाले. यावरून आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या घराण्यातील नेत्यांकडून पुन्हा शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या गोकुळच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत महाडिक विरूद्ध बंटी पाटील यांच्यातील जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पहायला मिळाल्या दरम्यान आता पुन्हा राजाराम कारखान्याच्या निमीत्ताने हे चित्र पहायला मिळण्याची शक्यता आहे.

राजाराम कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ सप्टेंबरला होणार आहे. यावरून महाडिक आणि पाटील असा कलगीतुरा गोकुळनंतर पुन्हा पहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान विरोधी गटाचे आमदार सतेज पाटील यांनी यावर आता रान तापवण्यास सुरूवात केली आहे. सतेज पाटील हे काल माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी जोरदार निशाणा साधला.

ते म्हणाले की, बनावट १२०० सभासद अपात्र झाल्याने पोटनियम बदलण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर राजाराम कारखाना खासगी करून घेण्याचा ठराव मंजूर करून घ्यावा, पोटनियमातील बदल पाहता कारखाना खासगीकरणाकडे वाटचाल करत असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.

'कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे सहा तालुक्यांत कार्यक्षेत्र आहे. शाहूवाडीपासून राधानगरी तालुक्यातील चांदे - कोते पर्यंतचे कार्यक्षेत्र आहे. लोकांना वार्षिक सभेला येण्यासाठी वेळ लागतो. यासाठी सभेची वेळ सकाळी ११ ऐवजी दुपारी १ ची केली पाहिजे. तसेच, कारखान्याच्या पोटनियमात अनेक बदल केले जात आहेत.

Satej Patil vs Amal Mahadik
Rajaram Sahakari Sakhar Karkhana : महाडिक गटाला धक्का, राजाराम सहकारी साखर कारखान्यात शौमिका महाडिकांसह १२७२ सभासद अपात्र

१२०० सभासद अपात्र झाले, तोच पोटनियम नव्याने आणला जात आहे. त्यामुळे भाड्याने जमीन दिली तरी सभासद होता येते. पोटनियमातील बदल पाहिले, तर हा कारखाना खासगीकरणाकडे वाटचाल करत आहे. सहकारातील कारखाना वाचला पाहिजे. जे चांगले आहे त्याला निश्चित पाठिंबा दिला जाईल.

अनेक गावांमध्ये गेल्या निवडणुकीत आम्हाला मतदान मिळाले, त्यांचे ऊस पुरवठ्याचे करार करुन घेतले जात नाहीत. दुसरीकडे उसाचा तुटवडा असल्याने कोणत्याही गावातील कितीही ऊस आणला तरीही चालतो. मात्र, सत्ताधाऱ्यांना उसापेक्षा सांगली जिल्ह्यातील १२ गावे कार्यक्षेत्रात घेऊन त्यांना सभासद करून घ्यायचे आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com