Watermelon Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Watermelon Cultivation : ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरद्वारे कलिंगड लागवड

वाडा : तालुक्यातील अनेक गावांत कलिंगडाची लागवड केली जात असून ती आधुनिक पद्धतीने केली जात आहे. पूर्वी ही लागवड पारंपरिक पद्धतीने केली जायची. पण आता ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरचा वापर करत शेतकरी कलिंगडाचे उत्पादन घेत आहेत

टीम ॲग्रोवन

वाडा : तालुक्यातील अनेक गावांत कलिंगडाची लागवड (Watermelon Cultivation) केली जात असून ती आधुनिक पद्धतीने केली जात आहे. पूर्वी ही लागवड पारंपरिक पद्धतीने केली जायची. पण आता ठिबक सिंचन (Drip Irrigation), मल्चिंग पेपरचा वापर करत शेतकरी कलिंगडाचे उत्पादन (Watermelon Production) घेत आहेत. यामुळे वाडा तालुक्यातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले असल्याचे दिसून येत आहे.

वाडा तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. भातशेतीनंतर कडधान्ये, भाजीपाला, फुलशेती व फळशेती येथील शेतकरी करतात. कोनसई, कोंढले, मुसारणे, देवघर, पालसई, गातेस, सोनाळे, निचोळे, चिखले, दुपारे पाडा आदी गावांत कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने कलिंगडाची लागवड करीत असत.

त्यामुळे म्हणावे तसे पीकही येत नव्हते. तसेच पिकावर पडणाऱ्या रोगामुळे संपूर्ण कलिंगड नष्ट होत असे. आता मात्र पारंपरिक पद्धतीला छेद देत येथील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने कलिंगड पिकाची लागवड केली आहे. कोनसई येथील शेतकरी बाळकृष्ण यादव मोकाशी यांनी भागीदारीत आधुनिक पद्धतीने पाच एकर जागेत कलिंगड पिकाची लागवड २ नोव्हेंबर रोजी केली असून त्यांना यासाठी किमान चार लाख खर्च अपेक्षित आहे.

अशी केली जाते लागवड

सर्वप्रथम शेतीची नांगरणी करून चरी (वलवे) पाडले जातात. त्यानंतर मल्चिंग पेपर टाकला जातो. मल्चिंग पेपरला छेद पाडून त्यावर कलिंगडाचे बी टाकले जाते. येथे पाणी, औषधे व खते ही ठिंबक सिंचनातून दिली जातात. यामुळे आर्द्रता टिकून राहते. त्या भागात गवत होत नाही. रोगाचे प्रमाण कमी राहते आणि महत्त्वाचे म्हणजे मनुष्यबळ फार कमी लागते.

ठोस उत्पन्नाचे पीक

भातशेती व्यवसाय हा पूर्वीपासून नुकसानीत चालत आलेला व्यवसाय आहे. त्यामुळे ठोस उत्पन्नाचे पीक म्हणून शेतकरी कलिंगड लागवडीकडे वळला आहे. गावातील तीन ते चार शेतकरी एकत्र येऊन भागीदारी पद्धतीने मुबलक पाण्याच्या ठिकाणी कलिंगड लागवड करीत आहेत.

यंदा साडेतीन एकर जागेत कलिंगडाची लागवड केली आहे. त्यांनी कॅडी, ऑगस्टा या दोन प्रकारचे बियाणे वापरले आहे. यात कॅडी हे लांब फळ; तर ऑगस्टा हे गोल फळाचे बियाणे आहे. साधारणपणे ८० दिवसांत हे पीक तयार होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नितीन पाटील, युवा शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT