Maharashtra Crop Damage agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Crop Damage : कापूस, सोयाबीन, केळी, भात सगळचं गेल वाहून, कृषी विभागाकडून नुकसानीची आकडेवारी जाहीर

Maharashtra Rain : अतिवृष्टी, पूर आणि पावसामुळे राज्यात सुमारे ४ लाख १९ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.

Team Agrowon

Maharashtra News : राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान अतिवृष्टी, पूर आणि पावसामुळे राज्यात सुमारे ४ लाख १९ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.

यामध्ये राज्यातील १० जिल्ह्यांत याचा सर्वाधिक फटका बसला आहे तर सर्वात जास्त फटका यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यांतील शेतीला बसल्याची माहिती कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालातून आली आहे.

जळगावमध्ये १४९ हेक्टरवरील कापूस, केळी, मका, उडीद, मूग तसेच नागपूर जिल्ह्यातील १९९ हेक्टरवरील कापूस सोयाबीन, संत्रा, मोसंबी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय वर्धा जिल्ह्यात १ हजार ६५९ हेक्टर, भंडारा २ हजार २३५ हेक्टर, गडचिरोली ४०२ हेक्टर, अकोला १४ हजार ७०० हेक्टर, बुलडाणा १ लाख ५४ हजार ४१३ हेक्टर, चंद्रपूर ५ हजार ७५८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

रायगड जिल्ह्यातील सुधागड, पाली, कर्जत तालुक्यातील ४५ हेक्टरवरील भात व नाचणी, तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, चिपळूण, दापोली, खेड व मंडणगड या तालुक्यातील १७ हेक्टरवरील आंबा, फणस, नारळ, भात, सुपारी आणि भाजीपाला या पिकांना फटका बसला आहे.

राज्यात खरिपाच्या ८१ टक्के पेरण्या पूर्ण

राज्याचे खरीप हंगामातील पिकांखालील सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून, सोमवारअखेर (दि. २४) प्रत्यक्षात ११४ लाख ६४ हजार हेक्टर (८१ टक्के) क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.

राज्यात १ जून ते २४ जुलै या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ४६३.८ मिमी असून, या खरीप हंगामात २४ जुलैपर्यंत प्रत्यक्षात ४५७.८ मिमी (सरासरीच्या ९९ टक्के) एवढा पाऊस पडला आहे. त्यामुळे राज्यात पेरणीच्या कामास आता वेग आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT