
Latur News : कृषी विभागातील पाच जिल्ह्यात खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर आहे. त्या तुलनेत २३ लाख ६० हजार ४९९ हेक्टर क्षेत्रावर ८५ टक्के प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे.
लातूर कृषी विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत मागील सप्ताहात हवामान थंड व ढगाळ होते. विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ मिलिमीटर असून, २० जुलैपर्यंत २१७.३४ मिलिमीटर इतका पाऊस झाला. तो २० जुलैच्या सरासरीच्या ७८ टक्के आहे. वार्षिक सरासरीच्या २७ टक्के इतका पाऊस झालेला आहे.
क्षेत्रनिहाय पीकस्थिती
खरीप ज्वारी ः सरासरी क्षेत्र ९४ हजार १७८ हेक्टर असून २० हजार १४७ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या २१ टक्के पेरणी झाली आहे. पीक सध्या उगवणीच्या व रोप अवस्थेत आहे.
बाजरी ः सरासरी क्षेत्र ११ हजार ८४२ हेक्टर असून केवळ १२९५ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११ टक्के पेरणी झाली आहे. पीक सध्या उगवणीच्या व रोप अवस्थेत आहे.
मका ः सरासरी क्षेत्र ३० हजार ९६५ हेक्टर असून प्रत्यक्षात ८ हजार ३९९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पीक सध्या उगवणीच्या व रोप अवस्थेत आहे.
मूग ः सरासरी क्षेत्र ९६ हजार ८४१ हेक्टर असून, ३२ हजार २१३ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३३ टक्के पेरणी झाली आहे. पीक सध्या उगवणीच्या व रोप अवस्थेत आहे.
उडीद ः सरासरी क्षेत्र ९८ हजार ९२७ हेक्टर असून, ३४ हजार ९८६ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३५ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पीक सध्या उगवणीच्या व रोप अवस्थेत आहे.
तूर ः सरासरी क्षेत्र ३ लाख ४९ हजार २५३ हेक्टर असून, २ लाख ६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पीक सध्या उगवणीच्या व रोप अवस्थेत आहे.
कपाशी ः सरासरी क्षेत्र ४ लाख ८५ हजार ०८८ हेक्टर असून, ३ लाख ८९ हजार ९४९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. ८० टक्के क्षेत्रावर असलेले कपाशीचे पीक सध्या उगवणीच्या व रोप अवस्थेत आहे.
सोयाबीनवर शंखी गोगलगायचे आक्रमण
पाचही जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १५ लाख ७१ हजार ८६८ हेक्टर असून, १६ लाख ६२ हजार ५९१ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०६ टक्के पेरणी पीक सध्या उगवणीच्या व रोप अवस्थेत आहे.
विभागातील लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी अल्प प्रमाणात शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. यावर एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
जिल्हानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
लातूर ५३४७०२
धाराशिव ३८०९३३
नांदेड ६७७९५९
परभणी ४४३०८४
हिंगोली ३२३८२१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.