Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात; शेतकरी कोलमडला

टीम ॲग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टीने (Heavy Rainfall) थैमान घातल्याने शिवारे पण्याखाली गेली असून नुकसान (Crop Damage) वाढले आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून सर्वत्र पाणी वाहत आहे. गुरुवारी (ता. २०) रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत येवला येथे सर्वाधिक १०३ मिमी पाऊस झाला. अतिवृष्टी झाल्याने येवला शहरातील मुख्य बाजारपेठेत घुसलेले पाणी अनेक दुकानांत गेल्याने व्यवसायिक व शहरालगत असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

जिल्ह्यात खरीप हंगाम तर वाया गेला तर रब्बीच्या तोंडावर शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे.जिल्ह्यात येवला, कळवण, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, निफाड, सिन्नर तालुक्यांत अतिवृष्टीने पुन्हा एकदा दाणादाण उडविली आहे. जिल्ह्यात सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, भाजीपाला, टोमॅटो, डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळ व रब्बी कांदा रोपवाटिका, कांदा लागवडी बाधित झाल्या आहेत.

सोगणीला आलेले सोयाबीन व मका पीक पाण्यात भिजत आहे. कळवण तालुक्यात सर्वदूर अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. सुरगाणा तालुक्यातील उंबरठाणा व सुरगाणा या महसूल मंडलात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाल्याने या भागातील भात पिकांना मोठा फटका बसला आहे. नाशिक शहर परिसरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे भाजीपाला पिकांसह छाटलेल्या द्राक्ष बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.

सिन्नर तालुक्यात वावी, शहा, पश्चिम पट्ट्यातील सोनांबे, परिसराला पवसाने पुन्हा झोडपले. दिंडोरी तालुक्यात उमराळे येथे अतिवृष्टी झाली. इगतपुरीत सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पेठ तालुक्यातील कोहोर महसूल मंडलात अतिवृष्टीचा तडाखा बसला. नांदगाव तालुक्यात वेहेळगाव, हिसवळ परिसरातमुसळधार पाऊस झाला. मालेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सौंदाणे परिसरात पावसाचा जोर दिसून आला. सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव, डांगसौंदाणे परिसरात जोरदार सरी झाल्या. निफाड तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस होता.

द्राक्ष हंगाम अडचणीत

सतत पडणाऱ्या पावसामुळे द्राक्ष बागेत डाऊनी, करपा तसेच घड जिरण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. तसेच जमिनीत वाफसा नसल्यामुळे काडीवर मुळ्या फुटलेल्या आहेत. बागा कुजत आहेत, घड गळ होत असल्याने पीक संरक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आर्थिक कोंडी वाढती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT