Rain Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain : बोदवड, पारोळ्यात मुसळधारेने पिके पाण्यात

Latest Rain Update : गेल्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने गुरुवारी (ता. २१) रात्री अकरा ते पहाटे चारच्या दरम्यान बोदवड व पारोळा तालुक्यांतील शहरी व ग्रामीण भागात ‘ढगफुटी’सदृश पाऊस झाला.

Team Agrowon

Latest Agriculture News : गेल्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने गुरुवारी (ता. २१) रात्री अकरा ते पहाटे चारच्या दरम्यान बोदवड व पारोळा तालुक्यांतील शहरी व ग्रामीण भागात ‘ढगफुटी’सदृश पाऊस झाला. या पावसामुळे शेतशिवारात पाणी साचून कापसासह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दरम्यान, शेवगे बुद्रुक (ता. पारोळा) परिसरातील शिवल्या नालास आलेल्या पुरात बैलजोडी वाहून गेल्याने मृत्युमुखी पडली. जामनेर तालुक्यात तोंडापूरसह परिसरात पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे खडकी नदीला मोठा पूर आला. पुराचे पाणी जामनेर रस्त्यावरील पुलावर आल्याने सकाळी दहापर्यंत जामनेर ते तोंडापूर वाहतूक बंद होती.

पारोळा तालुक्यातील म्हसवे, जोगलखेडे, वडगाव प्र. अ. यासह पारोळा, चोरवड, शेळावे, बहादरपूर, तामसवाडी, सार्वे, बोळे या सात मंडळालांत जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे कापसाला आलेली बोंडे गळून पडली आहेत, तर मे महिन्याच्या झालेली कपाशीची लागवड धोक्यात आली आहे.

दरम्यान, तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, स्वर्गवासी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. भिकनराव पाटील, सुनील देवरे यांनी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, पीकविमा कंपनीने याबाबत तत्काळ दखल घेऊन शेतीचे पंचनामे करावेत.

तसेच कृषी विभागाने याबाबत लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, तालुक्यातील जोगलखेडे येथील शेतकरी राजू पाटील, नीलेश पाटील, छोटू पाटील यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले असून, पंचनाम्याची मागणी केली आहे.

शेवगेत सर्वाधिक नुकसान

शेवगे बुद्रुक, ता. पारोळा : परिसरात मध्यरात्री बारा ते दीड या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यामुळे शिवल्या नालास महापूर आला. युवराज निकम यांची घरासमोरील बैलजोडी पुरात वाहून गेल्याने मृत्युमुखी पडली तर दूध उत्पादक सहकारी संस्थेत तीन ते चार फूट पाणी शिरल्यामुळे पंचांसमक्ष कार्यालय उघडण्यात आले.

बोदवडला पिकांचे नुकसान

बोदवड : तालुक्यातील जामठी, लोणवाडी, येवती, रेवती, धोंडखेडा, कुर्हा हरदो अशा अनेक गावांत पुन्हा एकदा ‘ढगफुटी’सदृश पाऊस झाला. लोणवाडी गावात अनेक घरांत पाणी शिरले आहे. याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांना बसला आहे. लोणवाडीतील २० घरे पाण्याखाली गेली आहेत.

यापूर्वी जुलै महिन्यात या परिसरात अशाचप्रकारे अतिवृष्टी होऊन शेतीचे, घरांचे मोठे नुकसान झाले होते. मध्यरात्री या परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे बांध फुटले असून, शेतात पाणी साचले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील सामान भिजले आहे. शेतजमीन खरडून पिके वाहून गेली असून, शेतात पाणी साचले असल्याने जे पिके उभे आहेत.

बोदवडला पंचनाम्याचे आदेश

जामठीसह लोणवाडीत झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांसह रहिवाशांचे अतोनात नुकसान केले आहे. याचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार मयूर कडसे यांनी दिले आहे.

जामनेरच्या खडकी नदीला पूर

तोंडापूरसह परिसरात रात्रीच्या सुमारास नऊपासून पावसाला सुरुवात झाली. रात्रभर चाललेल्या पावसामुळे व रात्रीच्या १ ते ४ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अजिंठा डोंगररांगांमधील नद्यांना पूर आल्याने व तोंडापूर मध्यम प्रकल्प आधीच १०० टक्के भरून ओसाडत असल्याने खडकी नदीला मोठा पूर आला होता. पुरामुळे तोंडापूर ते जामनेर रस्त्यावरील पुलावर सकाळी दहापर्यंत पाणी वरून वाहत असल्याने वाहतूक बंद होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT