Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अतिवृष्टीमुळे ९ हजार ८२२ हेक्टरवर पिकांची धूळधाण

टीम ॲग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात १ ते ५ सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमध्ये (Nashik Heavy Rain) मालेगाव, देवळा, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी, सिन्नर या सहा तालुक्यांतील १२२ गावांमधील १४ हजार ७४० शेतकऱ्यांच्या ९ हजार ८२२ हेक्टर ५० आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. ज्यामध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीन (soybean), मका (Maize), भात व भाजीपाला पिकांचे (Vegetable Crop Damage) आहे, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार समोर आली आहे.

१ सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे सिन्नर तालुक्यातील सर्वाधिक ७६ गावे नुकसानग्रस्त झाली आहेत. ज्यामध्ये ८ हजार ८८१ शेतकऱ्यांच्या ७ हजार १५१ हेक्टरवरील पिकांची दाणादाण उडाली आहे. त्यांनतर मालेगाव व इगतपुरी तालुक्यांत मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामातील जिरायत क्षेत्रावर ७ हजार ५२० हेक्टर ४० आर, तर बागायती क्षेत्रावरील २ हजार २१४ हेक्टर ७० आर पिकांचे नुकसान दाखविण्यात आले आहे.

पश्‍चिम भागात अधिक नुकसान आहे

सिन्नरच्या अगोदर इगतपुरी तालुक्यात ढगफुटीसदृश स्थिती तयार झाली होती. त्यात इगतपुरी तालुक्यातील २० गावांमधील १ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या ६६८ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. यासह वार्षिक फळपिकामध्ये सीताफळ व डाळिंब पिकाचे नुकसान दाखविण्यात आले आहे. हा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात वस्तुनिष्ठ पंचनामे झाल्यास हा आकडा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.

सोयाबीन, मक्याला सर्वाधिक फटका

जिल्ह्यातील अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. सोयाबीनचे ३ हजार ९६८ हेक्टर ९० आर वरील, तर त्याखालोखाल मक्याच्या १ हजार ९१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीन, मका, भाताच्या उत्पादनांत घट येणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मालेगाव व सिन्नर तालुक्यांत मक्याचे नुकसान मोठे आहे. तर भात पिकाला सर्वाधिक इगतपुरी व सिन्नर तालुक्यांत आहे.

जिल्ह्यांतील पिकांचे

नुकसान असे...

पीक क्षेत्र (हेक्टर)

मका १, ९१३

भात १०४९.५०

सोयाबीन ३९६८.९०

भुईमूग २०

कापूस ८

बाजरी ५६१

टोमॅटो १५९.५०

सीताफळ १५

डाळिंब ७२.४०

भाजीपाला २०५५.३०

तालुकानिहाय नुकसान

तालुका गावे बाधित शेतकरी क्षेत्र(हेक्टर)

मालेगाव ६ ४,०१५ १, ८४६

देवळा १ २१ १०

दिंडोरी २ ६ ३.५०

नाशिक १७ २६० १४४

सिन्नर ७६ ८८८१ ७१५१

इगतपुरी २० १५५७ ६६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT