Kharif Crop Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : पावसाच्या खंडामुळे पिके करपली

Crop Damage Due to No Rain : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील पावसाचा खंड काळ वाढत चालला आहे. तापमानात वाढ झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील पावसाचा खंड काळ वाढत चालला आहे. तापमानात वाढ झाली आहे. या दोन जिल्ह्यातील सर्वच भागातील हलक्या, मुरमाड डोंगराळ भागातील दगडगोट्याच्या तसेच मध्यम प्रकारच्या जमिनीवरील पिके कडक उन्हामुळे करपून गेली आहेत.

पानगळ झाल्यामुळे शिवारात पाला पाचोळा उडत असल्याचे चित्र अनेक भागात दिसत आहे.परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांमध्ये ३५ हून अधिक दिवस पावसाचा खंड आहे. जिंतूर, गंगाखेड, पालम तालुक्यातील डोंगराळ माळारानावरील दगडगोट्याच्या जमिनी तसेच परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा तालुक्यातील हलक्या, बरड, मुरमाड, मध्यम जमिनीतील ओलावा पूर्णपणे उडला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांमध्ये ३२ हून अधिक दिवस पावसाचा खंड आहे. सेनगाव, औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी, वसमत तालुक्यांतील डोंगराळ भागातील हलक्या, मध्यम,जमिनीत अजिबात ओलावा राहिला नाही. भेगा पडल्या आहेत.

पावसाने दडी मारल्याममुळे या दोन जिल्ह्यातील सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी, तूर आदी पिकांनी उन्ह धरले आहे.

सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी पिके वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. परंतु वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे अडचणी येत आहेत. विहिरी, बोअर, तलाव, प्रकल्पांतील पाणीपातळी खालावली आहे. चारा, पाणी टंचाईची चाहूल लागली आहे.

गंगाखेड तालुक्यातील माळरानावरील तसेच हलक्या, मध्यम जमिनीवरील पिकांना पाण्याचा मोठा ताण बसला आहे. फुलोरा अवस्थेतील सोयाबीन सुकले आहे. अन्य मंडलातील परिस्थिती जेमतेम आहेत. उत्पादकतेत मोठी घट येणार आहे. नुकसानीचे सर्वेक्षण सुरु आहे.
- पी. बी. बनसावडे, तालुका कृषी अधिकारी, गंगाखेड.
आमच्या भागात दोन ऑगस्ट पासून पाऊस नाही. पाण्याअभावी सोयाबीनचे खूप नुकसान झाले आहे. बांधावरील गवत सुकले आहे. तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. येत्या काळात चारा, पाण्याची टंचाई उद्भवणार आहे.
- ओंकार कोरे, राणीसावरगाव, ता. गंगाखेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT