Crop Damage : पावसाअभावी पिके हातची जाण्याची वेळ

Crop Damage Due To lack Of Rain : यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात माण, खटाव, फलटणसह सातारा आणि कऱ्हाडच्या पूर्वेकडील भागात सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिली.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Satara News : यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात माण, खटाव, फलटणसह सातारा आणि कऱ्हाडच्या पूर्वेकडील भागात सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी ३० ऑगस्टपर्यंत ९८.८ टक्के पाऊस झाला होता. यंदा तो आजअखेर ५३.१ टक्के झाला आहे.

त्यामुळे तब्बल ४५.७ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले असून, अनेक तालुक्यांमधील पिके दमदार पावसाविना वाळत आहेत. जिल्ह्यातील भात, सोयाबीन, ऊस, बटाटा, मका, ज्वारी आदी पिकांना पावसाअभावी उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात चारा आणि पाण्याची टंचाईही सुरू झाली असून पशुपालकांना चारा आणि पाणी विकत घेण्याची वेळ येऊ लागली आहे.

जिल्ह्यात यंदा ऑगस्ट महिना संपत आला तरी आजअखेर प्रत्यक्षात ५३.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तो पाऊस सरासरीच्या कितीतरी पट कमी आहे. हिच टक्केवारी गेल्या हंगामात ३० ऑगस्ट २०२२ अखेर प्रत्यक्षात सरासरी ९८.८ टक्के एवढी होती. या वर्षी सर्वांत कमी पावसाची नोंद फलटण (२६.५ टक्के), माण तालुक्यात (३०.१ टक्के) झाला आहे.

Crop Damage
Crop Damage : ऑगस्टमधील पावसाच्या खंडाने वाढली चिंता

सातारा (६४.८ टक्के), जावळी (६४.१टक्के), पाटण (५७.५ टक्के), कऱ्हाड (४४.१ टक्के), कोरेगाव (३३.२ टक्के), खटाव (३७.९ टक्के), खंडाळा (३६.८ टक्के), वाई (४९.४ टक्के), महाबळेश्‍वर (४७.१ टक्के) पाऊस झाला आहे. कमी पावसामुळे फलटण, माण, खटाव, कोरेगाव या चार तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पशुपालक आणि शेतकऱ्यांनी केली आहे.

Crop Damage
Crop Damage : नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी साडेचारशे कोटींची मागणी

चारा छावण्यांसाठी शेतकऱ्यांचा टाहो

चाऱ्याअभावी पशुधन संकटात येणार आहे. जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी विकत चारा घेऊन जनावरांना घालण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. त्यामुळे तातडीने चारा छावण्या सुरू कराव्या यासाठी शेतकऱ्यांनी मागणी करुनही चारा छावण्या सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांनी त्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे.

प्रशासनाने ग्रामीण भागात ज्या ठिकाणी चारा उपलब्ध आहे त्याचा आढावा घेऊन चाराची टंचाई होणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना कृषी विभागाला केल्या आहेत. सातारा जिल्ह्यात सध्या काही भागांत टँकर सुरू आहेत. अशीच स्थिती कायम राहिल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता असून, तसे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com