Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : ऑगस्टमध्ये १ लाख ३७ हजार हेक्टरवर पिकांना पावसाचा फटका

यंदाच्या खरिपात मराठवाड्यात पावसाने केलेल्या दाणादाणीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र पुढे येत आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार ऑगस्टमध्ये औरंगाबाद जालना, परभणी, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद या सहा जिल्ह्यांत १ लाख ५७ हजार ६३७ शेतकऱ्यांचे १ लाख ३७ हजार १७८ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

औरंगाबाद : यंदाच्या खरिपात मराठवाड्यात पावसाने (Heavy Rain) केलेल्या दाणादाणीमुळे खरीप पिकांचे मोठे (Crop Damage Due To Heavy Rain) नुकसान झाल्याचे चित्र पुढे येत आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार ऑगस्टमध्ये औरंगाबाद जालना, परभणी, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद या सहा जिल्ह्यांत १ लाख ५७ हजार ६३७ शेतकऱ्यांचे १ लाख ३७ हजार १७८ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान (Crop Damage) झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.अर्थात पंचनामे अंतिम हे क्षेत्र कमी अधिक होऊ शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मराठवाड्यात जून ते जुलै दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे जालना, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांतील ७ लाख ४ हजार ९९५ शेतकऱ्यांच्या ४ लाख ४८ हजार ७५४ हेक्टरवरील शेती पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. तसा अहवाल प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आला होता. आता ऑगस्टमध्ये आलेल्या प्राथमिक अंदाजातील नुकसानीच्या क्षेत्रामुळे या क्षेत्रात भर पडली आहे. ही भर नेमकी किती हे पंचनाम्याअंती स्पष्ट होईल.

जून, जुलैमध्ये झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी ३०९ कोटी २५ लाख ११ हजार रुपये निधीची आवश्यकता होती. याशिवाय याच दोन महिन्यात हिंगोली, नांदेड जालना या तीन जिल्ह्यांतील ७६ गावांतील ४८९ हेक्टर शेतजमीन अतिवृष्टी व पुरामुळे खरडून, वाहून जात त्या जमिनीवर तीन इंचापेक्षा अधिक जाडीचा गाळ साचला होता. या जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी १ कोटी ४२ लाख ९४ हजार रुपये निधीची आवश्यकता असल्याचे या आधीच प्रशासनाकडून शासनाला कळविण्यात आले आहे. दुसरीकडे कृषिमंत्र्यांनी पाच दिवसाच्या आत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रत्यक्ष प्रतिनिधी कळपात पाहणी करून दिलेले आहेत त्यामुळे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर पंचनामाचे काम सुरू आहे.

ऑगस्टमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झालेल्या क्षेत्रापैकी १ लाख ३६ हजार ७७७ हेक्टर क्षेत्र जिरायत, ४०१.४४ हेक्टर क्षेत्र बागायत आहे. या नुकसानग्रस्त क्षेत्रापैकी ७८ हजार ७६८ शेतकऱ्यांच्या ६६ हजार ४२६ हेक्टरवरील शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे झाले असल्याची माहितीही प्रशासनाच्या वतीने प्राथमिक अंदाजातून देण्यात आली आहे.

ऑगस्टमध्ये प्राथमिक अंदाजानुसार नुकसानग्रस्त क्षेत्र

जिल्हा... शेतकरी.... बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

औरंगाबाद.. ८९५८... ६७६४

जालना.... ९५१.... २७५.४४

परभणी... ५४१३.... ३७४८

हिंगोली... २४७५०... २३९५८

लातूर.... ४४०१२... ४२३५२

उस्मानाबाद.. ७३७३३... ६००८१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT