Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : खानदेशात पीक कर्ज वितरण कमीच

खानदेशात खरिपासंबंधी पीक कर्ज वितरण एप्रिल महिन्यात सुरू झाले आहे. पीक कर्ज वाटपात धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर असून, या बँकेने सुमारे २४० कोटी रुपये पीक कर्ज वितरण केले आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः खानदेशात खरिपासंबंधी पीक कर्ज (Kharif Crop Loan) वितरण एप्रिल महिन्यात सुरू झाले आहे. पीक कर्ज वाटपात (Crop Loan Disbursement) धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर असून, या बँकेने सुमारे २४० कोटी रुपये पीक कर्ज (Crop Loan) वितरण केले आहे. पण इतर बँकांची कामगिरी हवी तशी समाधानकारक नाही.

रब्बी हंगाम आला, पण खरिपातील लक्ष्यांक पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. खानदेशात पीक कर्जासंबंधी खरिपात सुमारे २८०० कोटी रुपये निधीचे वितरण अपेक्षित होते. जळगाव जिल्ह्यात १८०० कोटी, धुळ्यात ५०० आणि नंदुरबारात ६०० कोटी रुपये वितरण अपेक्षित होते. परंतु यंदाही पीक कर्ज वितरण फक्त ६० टक्केच झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँका एप्रिल ते मार्चपर्यंत पीक कर्ज वितरण सतत सुरू ठेवतात. या बँकांकडूनही पीक कर्ज वितरण हवे तेवढे झालेले नाही.

राष्ट्रीयीकृत बँकांनी पुन्हा एकदा पीक कर्ज वितरणात हात आखडता घेतला असून, फक्त १५०० कोटी रुपये पीक कर्ज वितरण खानदेशात या बँकांनी केले आहे. कर्ज बँकांना आपल्या निधीतून वितरित करायचे असते. शासन फक्त वितरण लक्ष्यांक निश्चित करते. परंतु बँकांनी आपल्याकडील निधी व इतर बाबी लक्षात घेऊन १०० टक्के पीक कर्ज वितरण केलेले नाही. नवी पीक कर्ज प्रकरणे रखडली आहेत. आता रब्बीत वितरण करू, असे राष्ट्रीयीकृत बँका सांगत आहे.

बँकांमध्ये नव्या पीक कर्ज प्रकरणासंबंधी कार्यवाही संथ आहे. पीक कर्ज नूतनीकरण फक्त राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमध्ये केले जात आहे. जळगाव जिल्हा बँकेला पीक कर्ज वितरणाचा लक्ष्यांक राष्ट्रीयीकृत बँकांएवढाच आहे. जिल्हा बँकेच्या सर्वाधिक शाखा ग्रामीण भागात आहेत. यामुळे जिल्हा बँकेने पीक कर्ज वितरणात आघाडी घेतली होती. धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेला राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत कमी कर्ज द्यायचे होते.

बॅंकाकडून केवळ टाळाटाळ

जळगाव जिल्ह्यात सेंट्रल बँक अग्रणी बँक म्हणून काम करते. तर नंदुरबारात स्टेट बँक अग्रणी बँक आहे. पीक कर्जाबाबत बँका व प्रशासनाची बैठक फक्त दोनदा झाली. यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष आहे. पीक कर्ज वितरणास राष्ट्रीयीकृत बँका गती देत नसल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. कारण या बँका विविध कारणे सांगून शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunetra Pawar Deputy CM: सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदी शपथ, बनल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

Local Body Election: मोहोळ तालुक्यातील ७२ ग्रा.पं.च्या निवडणुकांचे वेध

Livestock Exhibition: घोसरवाड येथे जातिवंत गीर गाय, मुऱ्हा म्हैस प्रदर्शन, स्पर्धा

Wheat Farming: माळशिरस तालुक्यात गव्हाचे पीक जोमात

Cooperative Institutions Crisis: महागाव तालुक्यात सहकारी संस्था अडचणीत

SCROLL FOR NEXT