Abdul Sattar Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : ३१ मेपर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई देणार; कृषिमंत्र्यांची माहिती

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या भागात गारपीट आणि अवकाळी पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना आणि फळबांगाना चांगलाचा तडाखा बसला आहे.

Team Agrowon

Maharashtra Budget Session 2023 राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटीमुळे (Hailstorm) शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले आहे. ऐन काढणीला आलेली पिके अवकाळीमुळे मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत पीकविमा योजनेंतर्गत (Crop Insurance) नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरूवारी (ता. १६) विधान परिषदेत दिली.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या भागात गारपीट आणि अवकाळी पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना आणि फळबांगाना चांगलाचा तडाखा बसला आहे. लेट खरीप कांद्याचे घसरलेले दर तसेच विविध शेतमालाचे पडलेले भाव यामुळे आधिच शेतकरी संकटात सापडला आहे.

अशातच अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. त्यामुळे आता अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देणारी बातमी दिली आहे.

राज्याचे कृषीमंत्री सत्तार यांनी अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत पिकविम्याचे पैसे दिले जातील, अशी माहिती दिली आहे.

विधानपरिषदेत बोलताना सत्तार म्हणाले की, कोणत्याही नुकसान झालेल्या शेतकऱ्यानी माहिती दिल्यानंतर त्याची भरपाई पाचही विमा कंपन्यांच्या माध्यमातून दिली जाईल.

या नुकसान भरपाईचे वेगवेगळे टप्पे असणार आहेत. सरकारच्या नियम आणि धोरणांनुसार शेतकऱ्यांना निश्चितपणे नुकसान भरपाई देण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: शेवग्याचा भाव उच्चांकी पातळीवर; सोयाबीन दरात सुधारणा, कापूस स्थिर, संत्र्याला उठाव तर डाळिंबाची आवक कमीच

Weekly Weather: सद्यःस्थितीत थंडी मध्यम स्वरूपात राहील

Mahavistar AI App: ‘महाविस्तार’ अ‍ॅप वापरात साक्री राज्यात अव्वल

Sarangkheda Horse Market: सारंगखेडा अश्‍व बाजारात यंदा विक्रमी उलाढाल

Indian Agriculture: आंतरवैयक्तिक संबंध हेच भांडवल

SCROLL FOR NEXT