Mahavistar AI App: ‘महाविस्तार’ अॅप वापरात
साक्री राज्यात अव्वल
Digital Agriculture: राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या अत्याधुनिक ‘महाविस्तार’ एआय आधारित अॅपच्या प्रभावी अंमलबजावणीत साक्री तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गावपातळीवर तालुक्यामध्ये शेवाळी येथे सर्वाधिक नोंदणी झाली असून, कृषी विभागाच्या या डिजिटल मोहिमेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.