Team Agrowon
राज्यातील विविध भागात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे.
अवकाळी पावसामुळे रब्बीसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गहू, हरभरा, मका, ज्वारीसह फळपिकांना फटका बसला.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
मराठवाडा, खानदेशसह विदर्भातील अनेक भागात अवकाळीचा फटका बसला आहे.
सध्या रब्बीसह भाजीपाला पिके काढणीवर असून पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत
काही ठिकाणी पावसाळी किंवा ढगाळ वातावरणामुळे पिकांची काढणी रखडत सुरू आहे.