Race horses: देशभरात उमद्या आणि जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा (ता. शहादा) येथील अश्व बाजाराने यंदा अश्वशौकिनांना चांगलीच भुरळ घातली आहे. या ऐतिहासिक बाजाराने आजवर अनेक चढ-उतार पाहिले असले, तरी यंदा खरेदी-विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे.