Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीक नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत द्यावी

Team Agrowon

Solapur News : ‘‘जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा काढणीपश्‍चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबतची सूचना नोंद करण्यासाठी पीकविमा ॲप अथवा टोल फ्री क्रमांक १८००११८४८५ या क्रमांकाचा वापर करावा.

तसेच टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास या आपत्तीची माहिती विमा कंपनीचे प्रतिनिधी, बँक, अथवा कृषी व महसूल विभाग यांना द्यावी’’, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी केले.

श्री. गावसाने म्हणाले, की सद्यःस्थितीत मागील ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस सुरू असून, काही भागांमध्ये जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले असू शकते.

या पार्श्‍वभूमीवर पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत पावसाच्या पाण्यामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्‍चित करण्यात येते.’’

सद्यःस्थितीत काही पिकांची काढणी सुरू असून, अधिसूचित क्षेत्रातील शेतात पीक कापणी करून सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांसाठीच कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यांपर्यंत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येते,’’ असेही गावसाने यांनी सांगितले.

‘पावणेसहा लाख शेतकऱ्यांचा पीकविमा’

‘‘पंतप्रधान ‘पीकविमा योजना खरीप २०२३’ या हंगामासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी खरीप २०२३ मध्ये ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पीकविमा योजनेअंतर्गत खरीप २०२३ मध्ये जिल्ह्यातील सहा लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७७ हेक्टर क्षेत्रासाठी पीकविमा उतरविलेला आहे,’’ अशी माहिती गावसाने यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT