Crop Loss Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : पाडलोसमध्ये गव्यांकडून चवळी पिकाचे नुकसान

जिल्ह्यातील पाडलोस परिसरातील बहुतांश गावांत रब्बी हंगामात नाचणी, कुळीथ, चवळी, उडीद, भुईमूग यासह विविध पिके घेतली जातात.

Team Agrowon

Ratnagiri Wild Animal News ः जिल्ह्यातील पाडलोस (ता. सावंतवाडी) येथील शेतीचे गव्यांच्या कळपांकडून नुकसान (Wild Animal Rampage) सुरूच आहे. काढणीयोग्य पिकांचे नुकसान (Crop Damage) गव्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान गुरुवारी (ता. २) गव्यांनी परिपक्व झालेल्या चवळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

जिल्ह्यातील पाडलोस परिसरातील बहुतांश गावांत रब्बी हंगामात नाचणी, कुळीथ, चवळी, उडीद, भुईमूग यासह विविध पिके घेतली जातात. खरिपातील भातपीक कापणी झाल्यानंतर तत्काळ या पिकांची लागवड केली जाते.

दरम्यान यावर्षी नोव्हेंबरमध्ये पिकांची लागवड केली होती. अवकाळी पावसामुळे या वर्षी या पिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव जाणवला होता. परंतु शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना करीत पिके वाचवली. या पिकांमधील चवळी पीक तर परिपक्व झाले होते.

परंतु गुरुवारी रात्री गव्यांच्या कळपांने चवळी पिकांचे पूर्णपणे नुकसान केले. काढणीयोग्य आलेल्या पिकाची पूर्णपणे नासधूस केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पाडलोस येथील शेतकरी विश्वनाथ नाईक यांचे चवळी पीकच गव्यांनी उद्ध्वस्त केले. शेतकरी गव्यांना पळवून लावण्यासाठी विविध उपाय करतात. परंतु रात्री-अपरात्री शेतीचे नुकसान गवे करीत आहेत.

दोन-तीन महिने प्रचंड काबाडकष्ट करून उभे केलेले पीक एक रात्रीत नाहीसे झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.

वन विभागाकडे सातत्याने मागणी करूनदेखील गव्यांबाबत ठोस उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकरी श्री. नाईक यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT