Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Unseasonal Rai Latur : लातूरला अवकाळी पावसाने झोडपले

Team Agrowon

Latur News जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. यात शुक्रवारी (ता. २८) रात्री तर अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यातील साठही मंडळात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

दोन मंडळात चोवीस तासात १२५ मिलिमीटर पाऊस होवून तेथील नागरीकांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला आहे. या पावसाचा मोठा फटका (Crop Damage) शेतकऱ्यांना बसला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तापमान वाढल्याने नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत होते. पण गेल्या दोन तीन दिवसात मात्र जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यासारखा पावसाचा अनुभव लातूरकर घेत आहेत.

दररोज रात्री वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. त्यात शुक्रवारी तर अवकाळी पावसाने कहरच केला. जिल्ह्यातील साठही महसूल मंडळात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात लातूर तालुक्यातील तांदूळजा मंडळात आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातील बोरोळ मंडळात सव्वाशे मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

यात लातूर तालुक्यात लातूर मंडळात २५, बाभळगाव ४७.५, हरंगूळ २५, कासारखेडा ५६.३, मुरुड २३.८, गातेगाव १०, तांदूळजा १२३, चिंचोली २१.५, कन्हेरी मंडळात २२.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुक्यात एकूण ३९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

औसा तालुक्यात सरासरी ३७.७ मिलिमीटर पाऊस झाला असून यात औसा ४०.३, लामजना २०.५, मातोळा ३१.५, भादा ४०.३, बेलकुंड ३१.३, किनी २२.३, किल्लारी ८७, उजनी २८.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

अहमदपूर तालुक्यात अहमदपूर १०, खंडाळी ८.८, किनगाव १६.३, अंधोरी ११, शिरुर ताजबंद ३३.८, हडोळती मंडळात १४.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर तालुक्यात सरासरी १५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT