Crop Damage Compensation  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचे संकट मोठे

Nanded Heavy Rain Damage : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात आठ नागरिकांसह २०७ जनावरांना जीव गमवावा लागला आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात आठ नागरिकांसह २०७ जनावरांना जीव गमवावा लागला आहे. अतिवृष्टीचे संकट मोठे असले, तरी प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिले.

नियोजन भवनातील कॅबिनेट हॉलमध्ये बुधवारी (ता. २) जिल्हाधिकारी श्री. राऊत पत्रकारांशी बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील अतिवृष्टीसंदर्भात बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, की जुलेमध्ये नांदेडमधील ८९ महसूल मंडळापैकी तब्बल ८१ मंडलांत एकापेक्षा अधीक वेळा अतिवृष्टी झाली आहे.

यात किनवट तालुक्यातील बोधडी व जलधारा मंडलांत पाच वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. तर इतर चार मंडलांत चार वेळा अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. चार-पाच महिन्यांत पडणारा पाऊस काही तासांत पडून गेल्यामुळे नुकसान अधिक झाले. अशावेळी आपत्ती निवारण पथकालाही मदत करण्यासाठी मर्यादा येत होत्या.

परंतु प्रशासनाने सर्वच शासकीय यंत्रणांच्या मदतीने आपत्तीचा यशस्वी सामना केला. या संकटात जिल्ह्यातील आठ नागरिकांसह २०७ जनावरांना जीव गमवावा लागला. तसेच ३४० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे नुकसान झाले. पाझर तलावाचेही नुकसान अधिक असल्याचे ते म्हणाले. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

काही ठिकाणी ड्रोणद्वारे पंचनामे करण्यात येत आहेत. २० तारखेपर्यंत अंतिम अहवाल शासनाला जाईल असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. नुकसानीबाबत शासकीय यंत्रणांच्या पंचनाम्यात नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडूनही भरपाई मिळेल, त्यांनी याबाबत पूर्वसूचना दिली नाहीतरी चालेल, असे ते म्हणाले.

सीएससी चालकाविरुद्ध कारवाई करणार

जिल्ह्यात प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा भरण्याचे काम सुरू आहे. परंतु यात काही सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) चालकांनी चालाखी करत अनेक शेतकऱ्यांच्या नावे परस्पर विमा भरून यात स्वत:च्या नातेवाइकांचे बँक खाते जोडले आहे. हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आला आहे. याबाबत संबंधित सीएससी चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT