Crop Damage : अतिवृष्टीमुळे १२ लाख हेक्टरवरील पिकांची हानी

Heavy Rain Crop Loss : अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे राज्यात खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीचे क्षेत्र आता १२ लाख हेक्टरपर्यंत गेले आहे. पिकांचे सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झालेले आहे.
Crop Damage Compensation
Crop Damage Compensation Agrowon
Published on
Updated on

Pune News : अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे राज्यात खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीचे क्षेत्र आता १२ लाख हेक्टरपर्यंत गेले आहे. पिकांचे सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झालेले आहे.

महसूल विभागाच्या अहवालानुसार, मराठवाड्यातील नांदेडसह देगलूर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, किनवट, माहूर, हातगावड, उमरी या तालुक्यांमधील खरीप पिकांना अतिपावसाचा तडाखा बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या तालुक्यांमधील चार लाख ४६ हजार हेक्टरमधील सोयाबीन, तूर, कापूस, भाजीपाला पिके नष्ट झाली आहेत.

Crop Damage Compensation
Crop Damage : नांदेड जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टर क्षेत्र बाधित

अतिपावसामुळे बुलडाण्याच्या मलकापूर, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद या तालुक्यांमधील दीड लाख हेक्टरहून जास्त खरीप पिके वाया गेली आहेत. यात मूग, उडीद, कापूस, सोयाबीन, तूर व मका पिकाचा समावेश आहे.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, अतिपावसामुळे खरीप पिकांच्या नुकसानीची व्याप्ती आता १२ वरून १७ जिल्ह्यांपर्यंत गेली आहे. पावसाचा तडाखा बसलेल्या गावांमधील नुकसानग्रस्त जमीन व पिकांचे पंचनामे अद्यापही सुरु आहेत.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : बीडमध्ये नुकसान ८१० कोटींचे; शेतकऱ्यांच्या हाती २८१ कोटीच

राज्यात खरीप पिकांबरोबरच काही जिल्ह्यांमध्ये फळबागांचीही मोठी हानी झाली आहे. पालघर, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यातील बागांना पावसाचा तडाखा बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही गावांमध्ये आंबा, फणस, नारळ, सुपारी बागांची; तर जळगाव भागात केळी बागांचे नुकसान झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या पीक नुकसानीची आकडेवारी अशी (सर्व आकडे हेक्टरमध्ये) ः पालघर १००३, रायगड ३७१०, रत्नागिरी ११०, सिंधुदुर्ग ३५१, जळगाव १४९५, कोल्हापूर ५१८, अकोला १३७६५८, बुलडाणा १५२४१३, वाशीम ४५८७४, अमरावती ६६८४८, नागपूर २०१४, वर्धा ९४०४, भंडारा २५६४, चंद्रपूर ३२६१९ आणि गडचिरोली १६१३.

४३ हजार हेक्टर जमीन खरडून गेली

पूर व अतिपावसामुळे पिके तर गेलीच; पण काही भागांमध्ये जमीन खरडून गेली आहे. खरडून गेलेल्या जमिनीचे क्षेत्र आतापर्यंत ४३ हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. जमिनीचे सर्वाधिक नुकसान नांदेड व बुलडाणा जिल्ह्यात आहे. तेथे अनुक्रमे १७६९१ हेक्टर व १२२२४ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्यापाठोपाठ यवतमाळ ७८४१ हेक्टर, अकोल्यात ३६१७ हेक्टर तर वाशिमला १७६९ हेक्टर जमिनीची हानी झाल्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com