Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : विजेचा लपंडाव, पिके सुकू लागली

Crop Damage : पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिना कोरडा गेल्यानंतर पुन्हा जुलै महिन्यात अत्यल्प पाऊस झाला.

Team Agrowon

Beed News : पाणी आहे तर वीज नाही, वीज आहे तर पाणी नाही अशी परिस्थिती सध्या तालुक्यात पहावयास मिळत असून पावसाअभावी कोरडवाहू क्षेत्रातील पिके करपली तर महावितरणच्या गलथान कारभारामुळे सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने बागायती पिके देखील सुकू लागली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेच्या गर्तेत आहेत तर कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिना कोरडा गेल्यानंतर पुन्हा जुलै महिन्यात अत्यल्प पाऊस झाला. तर मागील दीड महिन्यापासून पुन्हा पाऊस गायब झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी व कोरडवाहू शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरासरीच्या निम्म्यावर पावसाची नोंद तालुक्यात आहे.

त्यामुळे अत्यल्प पर्जन्यमान यावर्षी नोंद करण्यात आले. दरम्यान धरण दहा टक्क्यांवर आले असून धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. पावसाअभावी सध्या पाण्याची तसेच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. बागायतदार शेतकरी उपलब्ध पाण्याचे नियोजन करत पिके जोपासत आहेत, परंतु महावितरणकडून विजेचा अवेळी पुरवठा तसेच कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे.

यामुळे पाण्याच्या मोटारी वीज असली तरी चालत नसल्याच्या अनेक तक्रारी शेतकरी वर्गातून येत आहेत. त्यामुळे पाणी असूनही विजेअभावी पिके सुकत आहेत. तालुक्यातील मोगरा, शु. लिमगाव, डाकेपिंपरी, डिग्रस, खतगव्हाण, निपाणी टाकळी, सोन्नाथडी यासह दहा तांड्यावर मागील महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. चोवीस तासामध्ये तासभर देखील विद्युत पुरवठा सुरळीत राहत नसल्याने तारूगव्हाण बंधाऱ्यात असलेले पाणी शेतीला देत येत नाही.

ऊस जोपासावा की कापूस?

पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी देखील अद्याप मोठा पाऊस नाही. परिणामी, विहीर, विंधन विहिरींच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. दोन ते तीन तासच मोटारी चालतात. त्यामुळे ऊस पिकास पाणी द्यावे तर कापूस वाळतो आणि कापसाला पाणी द्यावे तर ऊस वाळतो. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT