Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Crop Competition : शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा जाहीर

Kharif Season 2023 : राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध भागांत विविध प्रयोग करण्यात येतात.

Team Agrowon

Nashik News : राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध भागांत विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होणे, नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादनांमध्ये वाढ होऊन इतर शेतकऱ्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळावे या दृष्टिकोनातून पीक स्पर्धांचे आयोजन केले जाते.

कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत खरीप पीक स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले.

नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांचा अंतर्भाव पीक स्पर्धेत केला आहे. स्पर्धेत सहभागासाठी मूग व उडीद या पिकांसाठी अंतिम दिनांक ३१ जुलै असून भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी अंतिम ३१ ऑगस्ट आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना स्वत:च्या नावावर असलेला ७-१२, व ८ अ आवश्यक असून, आदिवासी शेतकरी बांधवांसाठी जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. पीकनिहाय चलन फी ३०० रुपये आहे. पीक स्पर्धा योजनेत सहभागी होण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी कळविले.

पीक स्पर्धेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना बक्षिसाची रक्कम (हजार रुपये)

स्तर प्रथम द्वितीय तृतीय

तालुका ५ ३ २

जिल्हा १० ७ ५

राज्य ५० ४० ३०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT