Millet In Diet Agrowon
ताज्या बातम्या

Millet Crop : पौष्टिक तृणधान्याची जनजागृती करा

‘‘जागतिक स्तरावर २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. पौष्टिक तृणधान्य संकल्पनेतर्गंत ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा या पौष्टिक तृणधान्याचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे."

Team Agrowon

नगर ः ‘‘२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय ‘पौष्टिक तृणधान्य वर्ष’ (Millet Year) म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्य (Millet Diet) पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच नागरिकांच्या आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचे प्रमाण वाढविण्यासाठी पौष्टिक तृणधान्याच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करावी. ‘मिलेट ऑफ द मंथ’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवावी,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Dr. Rajendra Bhosle) यांनी केले.

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३’ साजरे करण्याबाबत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक झाली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कृषी उपसंचालक रवींद्र माने यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, ‘‘जागतिक स्तरावर २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. पौष्टिक तृणधान्य संकल्पनेतर्गंत ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा या पौष्टिक तृणधान्याचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे."

"त्यामुळे या बाबत सर्व माध्यमांद्वारे व्यापक स्वरूपात जागृती करावी. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कृषी महोत्सवात पौष्टिक तृणधान्याचे स्वतंत्र दालन उभारून या ठिकाणी तृणधान्यांची ओळख होण्यासाठी धान्य त्याच्या तपशिलासह उपलब्ध करून द्यावे.’’

‘‘पौष्टिक तृणधान्य पिकातील पोषणमूल्य व त्यांचे मानवी आहारातील महत्त्व जनमानसाच्या लक्षात आणून देण्यासाठी पथनाट्य, चर्चासत्रे, व्याख्यानांचे आयोजन करावे. पौष्टिक तृणधान्यापासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांच्या स्पर्धांचे आयोजन करावे."

"पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसेच यामध्ये विविध सामाजिक संस्थानांही सहभागी करून घ्यावे,’’ असे डॉ. भोसले म्हणाले.

‘मिलेट ऑफ द मंथ’ प्रभावीपणे राबवा’

‘‘भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पौष्टिक तृणधान्य पिकांच्या सेवनाला विशेष महत्त्व आहे. ही बाब विचारात घेऊन ‘मिलेट ऑफ द मंथ’ (तृणधान्य विशेष महिना) ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवावी,’’ असे आवाहन डॉ. भोसले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray: 'देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल'; ठाकरेंचे सूचक विधान

Shed Net House: हवामान बदलातील सुरक्षित शेतीसाठी शेडनेटगृहाचा स्मार्ट मार्ग

Local Body Results: नागपूर महापालिकेवर भाजपचा निर्विवाद झेंडा

Local Body Result: महायुतीला काठावरचे बहुमत

Crop Insurance : पंतप्रधान पिक विमा योजनेत कॉफी पिकाचा समावेश करा; खासदार प्रियंका गांधींचे केंद्र सरकारला पत्र

SCROLL FOR NEXT