Kolhapur News: अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोल्हापुरात महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले. महायुतीला ४४ तर महाविकास आघाडीला ३५ जागा मिळाल्या. या आघाडीतील काँग्रेसने एकट्याने ३४ जागा जिंकत आपली ताकद सिद्ध केली. महाविकास आघाडीतील इतर घटकांची विजयाची साथ न मिळाल्याने काँग्रेसला सत्तेपासून थोडक्यात बाजूला राहावे लागले..कोल्हापूरमध्ये महायुतीविरुद्ध काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यात थेट लढत होती. मात्र, पाटील यांनी एकहाती मैदान मारताना तब्बल ३४ जागा निवडून आणल्या. शिवसेना ठाकरे गटाला केवळ एक जागा मिळाल्याने केवळ तीन जागांमुळे कोल्हापूरची महापालिका सतेज पाटील यांच्या हातून निसटली..Local Body Result: सावंतवाडी, वेंगुर्लेत भाजप, मालवणात शिंदे शिवसेना .कोल्हापुरात काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. काँग्रेसच्या खात्यात ३४ जागा आहेत. भाजपच्या खात्यात २६ जागा आहेत. शिवसेना शिंदे गट १५ जागांवर राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ४ जागा मिळाल्या. जनसुराज्यने एक जागा जिंकली. कोल्हापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाटी कोरी राहिली. शिवसेना ठाकरे गटाचा केवळ एक उमेदवार विजयी झाला..इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत तब्बल ४३ जागा जिंकल्या. त्यामुळे महापालिकेत महायुतीची ४६ जागा जिंकत सत्ता आली असून विरोधी शिव-शाहू आघाडीला केवळ १७ जागा राखता आल्या. त्यांच्या अनेक दिग्गज चेहऱ्यांचा पराभव झाला. त्या खालोखाल शिवसेना शिंदे गटाने ३, ठाकरे शिवसेनेने १ तर अजित पवार राष्ट्रवादी गटाने एका जागेवर विजय मिळवला. .Local Body Result: बीड जिल्ह्यात ‘घड्याळा’चा गजर; महायुतीला यश.एकूण १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी ही निवडणूक झाली. येथील राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणीला आज सकाळी १० वाजता प्रारंभ झाला. प्रभाग क्रमांक ५ मधील लढत विशेष लक्षवेधी ठरली. येथे भाजपचा मातब्बर चेहरा असलेले माजी नगरसेवक सुनील पाटील यांचा पराभव करत शिवसेना (उबाठा) गटाचे शिवाजी पाटील यांनी विजय मिळवत ‘मशाल पेटवली. प्रभाग क्रमांक ३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) पक्षाचे उमेदवार तथा माजी आमदार अशोकराव जांभळे विजयी झाले..मात्र त्यांचे चिरंजीव सुहास जांभळे यांचा प्रभाग २ मधून पराभूत झाले. शिव-शाहू विकास आघाडीचे मातब्बर नेते असलेले संजय कांबळे, राहुल खंजीरे, प्रकाश मोरबाळे, अब्राहम आवळे यांना पराभवाचा धक्का बसला. शिवशाहू विकास आघाडीकडून संजय तेलनाडे, स्मीता तेलनाडे व सुनील तेलनाडे असे एकाच कुटुंबातील तिघेजण निवडून आले. संजय कांबळे यांच्यासह त्यांची मुलगी संतोषी कांबळे यांचा पराभव झाला. शिवसेना (शिंदे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने विजयी झाली. या पक्षाचे आणखी दोन उमेदवार नूतन मुथा, सरीता आवळे असे तीन उमेदवार विजयी झाले. गेल्या वर्षी विधान सभा निवडणुकीत पराभव झालेले मदन कारंडे प्रभाग क्रमांक ७ मधून विजयी झाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.