Cotton Rate
Cotton Rate Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Rate : कापूस दर खरंच दबावात आहे का ?

टीम ॲग्रोवन

पुणेः कापसाचा हंगाम (Cotton Season) सुरु झाल्यानंतर कापसाला मुहुर्तावर गेल्यावर्षीप्रमाणं विक्रमी दर मिळाले. मात्र आता कापसाला मुहुर्ताच्या दरापेक्षा कमी भाव मिळतोय. त्यामुळं कापसाचा बाजार दबावात आला, अशी चर्चा सुरु आहे. मात्र ही वस्तुस्थिती नाही. नव्या कापसात ओलावा अधिक आहे. तसचं जास्त उत्पादनाची (Cotton Producers) चर्चा असल्यानं सध्या दर कमी आहेत.

मात्र दिवाळीनंतर शेतकऱ्यांना सरासरी किमान ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलंय. सध्या देशातील कापूस उत्पादक राज्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. जून महिन्यात तसच पूर्वहंगामाी कापसाची वेचणी आता सुरु झाली. बोंड उमलत आहेत. मात्र पावसानं या बोंडांमध्ये पाणी शिरून नकुसान होतंय.

फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्या. तर अनेक ठिकाणी पाऊस सतत सुरु असल्यानं कोंबही फुटत आहेत. यामुळं कापूस उत्पादनात यंदा मोठी घट येईल, असं सध्या तरी दिसतंय. कापूस पिकाचं नेमकं किती उत्पादन होईल हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र कापूस पिकाचं होणारं नुकसानं वाढलंय.

मागील हंगामात शेवटच्या टप्प्यात कापसाला सरासरी १० हजार ते १२ हजार रुपये दर मिळाला. तसचं यंदा नवा कापूस बाजारात दाखल झाल्यानंतर मुहुर्ताला कापसाला १३ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यामुळं कापसाचे दर तेजीत असून बाजारात विक्री करावी, असं आवाहन शेतकऱ्यांना केलं गेलं.

मात्र प्रत्यक्ष बाजारातील परिस्थिती वेगळीच होती. प्रत्यक्ष कापासाला ओलावा आणि गुणवत्तेनुसार ७ हजारांपासून १० हजारांपर्यंत दर मिळतोय. त्यामुळं नेहमीप्रमाणं यंदाही आपली लूट होतेय, असं शेतकऱ्यांना वाटतंय.

मात्र शेतकऱ्यांनी भीती न बाळगता बाजाराचा आढावा घेऊनच कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय. दरवर्षी कापूस बाजारात येण्याच्या काळात पुरवठा वाढल्यानं दर नरमतात. यंदाही तसचं होतंय. उद्योग नेहमीप्रमाणं यंदा उत्पादन वाढेल, असं सांगतोय. दरवर्षी हंगामाच्या सुरुवातील जास्त उत्पादनाचा अंदाज दिला जातो.

शेतकऱ्यांचा कापूस विकून झाला की उत्पादनाचे खरे आकडे बाहेर येतात. त्याकाळात कापसाचे दर वाढतात. मात्र त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. तसचं मुहुर्ताच्या कापसाला देण्यात येणारे दर ही काही किलोसाठी किंवा क्विंटलसाठी देण्यात येतात आणि तीच बातमी सगळीकडे पसरविण्यात येते. त्यामुळं शेतकऱ्यांची दिशाभूल होते.

शेतकऱ्यांवर मानसिक दबाव निर्माण करण्याचं काम केलं जातं. त्यामुळं शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनाचा अंदाज घेणं गरजेचे आहे. यंदा उद्योगांनी उत्पादन वाढेल, असं म्हटलं तरी खरी परिस्थिती ऑक्टोबरच्या शेवटीच लक्षात येईल. पण उद्योगांच्या अंदाजाऐवढं कापूस उत्पादन होणार नाही, हे नक्की. त्यामुळं कापसाला यंदाही चांगला दर मिळेल.

सध्या नव्या कापसात ओलावा अधिक आहे. त्यातच शेतकरी दिवाळीसाठी कापूस विक्री करत आहेत. त्याचा बाजारावर दबाव येतोय. दिवाळीनंतर कापसाचे दर सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळं शेतकऱ्यांनी एकदाच कापूस न विकता टप्प्याटप्प्यानं विकावा. त्यामुळं बाजारात आवक दाटणार नाही आणि दरही टिकून रहतील. यंदा शेतकऱ्यांना किमान सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

Ethanol Production : केंद्राच्या निर्बंधांमुळे इथेनॉल निर्मितीत घट

Turmeric Seed : पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी थांबवली हळद बियाणे खरेदी

Agriculture Department : कृषी खात्याला गती देण्यासाठी ‘गेडाम पॅटर्न’

Mango Market : नागपूर-अमरावतीत स्थानिक आंबा वाणांचे दर दबावात

SCROLL FOR NEXT