Cotton Cultivation News Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Cultivation : अतिसघन पद्धतीने एक हजार एकरांवर होणार कापूस लागवड

Cotton Market : केंद्रीय कृषी मंत्रालयाद्वारे देशांतर्गत कापसाची प्रतिएकरी उत्पादकता वाढविण्यासाठी अतिसघन कापूस लागवडीचा पथदर्शी प्रकल्प वर्धा व नागपूर जिल्ह्यांत एक हजार एकरांवर राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Nagpur News : केंद्रीय कृषी मंत्रालयाद्वारे देशांतर्गत कापसाची प्रतिएकरी उत्पादकता वाढविण्यासाठी अतिसघन कापूस लागवडीचा पथदर्शी प्रकल्प वर्धा व नागपूर जिल्ह्यांत एक हजार एकरांवर राबविण्यात येत आहे. प्रकल्पात सहभागी शेतकऱ्यांना कापूस बियाण्याचे वितरण नुकतेच करण्यात आले आहे.

देशाअंतर्गत कापसाचे १३० लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यातील सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र ४० लाख हेक्‍टर राज्यात आणि राज्यांतर्गत १८ लाख विदर्भात आहे. क्षेत्र अधिक असले तरी उत्पादकता तुलनेत कमी आहे. त्यामुळे अतिसघन कापूस लागवड प्रकल्पाद्वारे उत्पादकता वाढीचा प्रयत्न केला जाईल.

राज्याच्या कापूस उत्पादकपट्ट्यात विविध संस्थांच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल. हा प्रकल्प कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्रीज कॉटन डेव्हलपमेंट अँड रिसर्च असोसिएशन’च्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जात आहे. यामध्ये कापूस झाडांची एकरी संख्या वाढणार आहे.

मोहगाव (ता. हिंगणा) येथे बियाणे वितरणाचा कार्यक्रम नुकताच झाला. या वेळी सरपंच प्रमोद डाखरे, तालुका कृषी अधिकारी दीपा कुंभार, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मनिकंडन, राज्य समन्वयक गोविंद वैराळे, ‘सीटीसीआरए’चे आशिष बिसेन, जगदीश नेरलवार, वर्षा काळे उपस्थिती होत्या. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच लागवडीचे नियोजन करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

...असे आहे लागवड अंतर

दोन ओळीतील अंतर ९० सेंमी (३ फूट) तर दोन झाडांतील अंतर १५ सेंमी (६ इंच) राहील. त्यानुसार एका हेक्‍टरमध्ये ७४ हजार झाडे राहतील. या लागवड पद्धतीत हेक्‍टरी १५ किलोचे बियाण्याचे पाकीट (सहा पाकीट एकरी) लागतील. पारंपरिक लागवड पध्दतीच्या तुलनेत यामध्ये हेक्‍टरी ३० टक्‍के उत्पादनात वाढ होईल, असा दावा करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT