Soybean, Cotton Rate : सोयाबीन, कपाशीच्या भाववाढीची प्रतीक्षा संपली

Kharif Season : खरीप हंगाम सुरू झाला असताना सोयाबीन आणि कापसाचे दर मात्र घसरलेलेच आहेत. तुरीला झळाळी मिळत असली तरी आवक त्यातुलनेत कमी आहे.
Cotton, Soybean market
Cotton, Soybean marketAgrowon

Amravati News : खरीप हंगाम सुरू झाला असताना सोयाबीन आणि कापसाचे दर मात्र घसरलेलेच आहेत. तुरीला झळाळी मिळत असली तरी आवक त्यातुलनेत कमी आहे. या उलट भाव वाढतील या अपेक्षेने आवक रोखून धरलेल्या शेतकऱ्यांनी आता सोयाबीन व कापूस बाजारात आणला आहे.

सरत्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाला खुल्या बाजारात अपेक्षित दर मिळू शकले नाहीत. भाव वाढतील, या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी आवक रोखून धरली खरी, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. गेल्या खरिपात अतिवृष्टी व संततधार पावसाने सायोबीनचे अतोनात नुकसान केले.

उत्पादनाची सरासरी घसरण्यासोबतच प्रतवारीतही घसरण आली. मागणी व पुरवठ्याचे समीकरण असंतुलित झाले असतानाही सोयाबीनला या हंगामात चढे दर मिळाले नाहीत.

Cotton, Soybean market
Kharif Sowing Update : नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

हमीदराच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपये वाढ मिळाली. मंगळवारी (ता. १३) स्थानिक बाजार समितीत सोयाबीनला ४७०० ते ४८८१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. एक वर्षापूर्वी ८ ते १० हजारांचा टप्पा गाठणाऱ्या सोयाबीनची या हंगामात मात्र वाताहत झाली.

भाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आवक रोखून धरली होती, आता नवा हंगाम सुरू होत असल्याने त्याचा संयम सुटू लागला असून बाजारातील सोयाबीनची आवक वाढली आहे. मंगळवारी (ता. १३) ५३१० पोत्यांची आवक नोंदविण्यात आली.

गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता आज ना उद्या भाव वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाची आवक रोखून धरली होती. गरजेपुरतीच शेतकऱ्यांकडून आवक आणली गेली. आता सातत्याने भावातील घसरण बघता शेतकरी भाववाढीची प्रतीक्षा करून थकला असून, आता नवा हंगाम सुरू होत असल्याने आर्थिक तजवीज करण्यासाठी त्याने आवक सुरू केली आहे.
राजेश पाटील, अडत व खरेदीदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com