Ujani Dam
Ujani Dam Agrowon
ताज्या बातम्या

Ujani Dam : ‘उजनी’ तून ‘भीमे’त विसर्ग कायम

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः उजनी धरण (Ujani Dam) व वीर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. उजनी धरणातून गुरुवारी (ता.२०) ४० हजार क्युसेकचा, तर वीर धरणातून १६ हजार ९०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. हा एकत्रित विसर्ग पुढे भीमा नदीत (Bheema Dam) मिसळत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून उजनी व वीर धरण क्षेत्र परिसरात अतिवृष्टी (Heavy Rainfall) झाल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

भीमा नदी पात्रात सध्या ३० हजार क्युसेकहून अधिक पाणी वाहत आहे. तर नाझरे धरणातून कऱ्हा नदीत १५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. कऱ्हा नदीचे पाणी नीरा नदीत मिसळत आहे. तेच पाणी पुढे भीमा नदीतही जात असल्याने भीमेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे पंढरपुरातील दगडी पूल तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पुळूज हे सहा बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता. २०) दौंडकडून उजनीत २६ हजार ८८५ क्युसेक पाणी येत होते. तर उजनीतून पुढे भीमेमध्ये ४० हजार क्युसेक विसर्ग सोडला होता. बुधवारी (ता. १९) तो तब्बल ६० हजार क्युसेकपर्यंत होता. त्यात २० हजार क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आला आहे.

तरीही अखंड प्रवाहामुळे नदीच्या पाण्यात लक्षणीय वाढ झाली आहे. उजनी धरणाच्या पाण्याची आवक-जावक नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने काहीशी उसंत घेतल्याने काहीसे साह्य मिळाले आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी स्थिर आहे. गुरुवारी (ता.२०) धरणाची एकूण पाणीपातळी ४९७.१६० मीटर एवढी होती. एकूण पाणीसाठा १२१.२० टीएमसी, तर त्यापैकी उपयुक्त साठा ५७.५४ टीएमसी आणि पाण्याची टक्केवारी १०७.४० टक्के राहिली.

पंढरपुरात पूरस्थिती भीमा नदीपात्रात एक लाख १५ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर पंढरपुरात नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. एक लाख ३८ हजार क्युसेक विसर्ग आल्यावर गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. तर एक लाख ७० हजार क्युसेक विसर्ग पाणी आल्यावर संतपेठ झोपडपट्टीतील सखल भागात पाणी येते. पाण्याचा हा विसर्ग लक्षात घेऊन पंढरपुरातही नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेऊन सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT