
रत्नागिरी ः जिल्ह्यात सर्वत्र पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे (Heavy Rainfall) बळीराजा त्रस्त झाला आहे. ढगांच्या गडगडाटासह मंगळवारी (ता. १८) दोन तास पडलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला जोरदार फटका बसला. गेले चार दिवस सायंकाळी पडणारा पाऊस मंगळवारी सकाळीच दाखल झाला. त्यामुळे कापलेली भात रोपे (Crop Damage) तशीच ठेवावी लागली.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत ६.६० मिमी पाऊस पडला. त्यात चिपळूणला २६, संगमेश्वर ९, लांजा २०, राजापूर ५ मिमी नोंद झाली. जिल्ह्यात भातपिके कापणीची तारांबळ उडाली आहे. २० ते २४ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मागील आठवड्यात सायंकाळच्या सत्रात पडणाऱ्या पावसाने पिके कापणीत अडथळा आणला होता. तरीही दिवसा पडलेल्या उन्हाचा फायदा घेऊन शेतकरी वर्ग कापणी उरकून घेत होता. काही ठिकाणी कापलेले शेत दोन दिवस कातळावर वाळवण्यासाठी ठेवले जात आहे.
ऊन लागली की ते गोळा करून भरून ठेवले जाते. संगमेश्वर तालुक्यात अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे कापलेली भातशेती पुन्हा पाण्याखाली गेली आहे. संगमेश्वर तालुक्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
सायंकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये गावात वीज कोसळल्याने महावितरणच्या विद्युत रोहित्रामध्ये बिघाड होऊन चार वाड्यातील वीजपुरवठा सलग ५ दिवस खंडित झाला आहे. त्याच ठिकाणी वीज कोसळल्याने जिओच्या टॉवरसह महावितरणच्या रोहित्रात पुन्हा बिघाड झाला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.