Gavran Mango Agrowon
ताज्या बातम्या

Gavran Mango : पुणे जिल्ह्यातील गावरान आंब्याची ग्राहकांना प्रतीक्षा

जून महिन्यात हंगाम बहरण्याचा अंदाज

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Mango Production : पुणे ः कोकण हापूसचा (Konkan Alphanso) हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, या हंगामानंतर सुरू होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील गावरान आंब्याची सध्या ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

मेअखेरीस पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट परिसरातील जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आदी डोंगरी तालुक्यांतून गावरान आंब्याची मोठ्या प्रमाणावर बाजार समितीमध्ये आवक होत असते.

मात्र यंदा लहरी हवामान आणि अवकाळी पावसाचा या आंब्याला फटका बसला आहे. उत्पादनात घट आणि उशिराची फळधारणा यामुळे सध्या गावरान आंब्याची तुरळक आवक होत असून, हंगाम बहरण्याची आणि मोठ्या आवकेची वाट ग्राहक पाहत आहे.

पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम घाट परिसरातील विविध डोंगरी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध जातींच्या आंब्यांची लागवड झालेली आहे. या आंब्याचा विशेष ग्राहकवर्ग असून, या आंब्याचा हंगाम साधारण मे महिन्याच्या अखेरीस सुरू होऊन तो जुलै महिन्यापर्यंत असतो.

या हंगामात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आंब्याचा बाजार प्रसिद्ध असून, पुणे बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक होत असते.

यामध्ये रसाचा आंबा, गोटी आंबा, राजापुरी, केसर आदी विविध वाणांचा समावेश असतो. यंदा लहरी हवामान आणि अवकाळी पावसाने फटका बसल्याने आंब्याच्या हंगामाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, गावरान आंबा हंगामाबाबत बोलताना प्रमुख आडतदार तात्या कोंडे म्हणाले, ‘‘गेल्या दोन-चार दिवसांपासून एक दोन हारे (मोठ्या पाट्या) आवक येत आहे. मंगळवारी (ता. ३०) मुळशी तालुक्यातून ५ हारे आवक झाली होती.

गेल्या वर्षी हीच आवक ५० हारे एवढी होती. मात्र यंदाच्या गारपिटीमुळे आंबा कमी आहे. येत्या ५ ते ७ जूननंतर आवक वाढेल आणि १५ जूननंतर हंगाम सुरू होईल.’’


कोकण हापूसचा कॅनिंगसाठीचा माल दाखल
मॉन्सून लांबल्याने कोकणातील हापूसचा हंगामदेखील लांबला असून, शेवटच्या टप्प्यातील आंबा बाजारात दाखल होत आहे. मात्र या आंब्याला ग्राहक नसल्याने आंबा मागणी अभावी शिल्लक राहत असल्याचे सध्याचे पुणे बाजार समितीमध्ये चित्र आहे.

सध्या रोज ५०० ते ७०० पेट्यांची आवक होत असून, ४ ते ६ डझनच्या आंब्याला १ हजार ५०० ते ३ हजार रुपये दर असून, प्रति डझनला २५० ते ७०० रुपये दर असल्याचे कोकण हापूसचे आडतदार अरविंद मोरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT