Shekhar Gaikwad Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Farming : पर्यायी पीक म्हणून उसाचा पर्याय योग्य

Sugarcane Cultivation : साखर उद्योगात नव्याने बदल होत आहे. जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या उत्पादनामुळे भारत एक नंबरला, दोन नंबरला ब्राझील तीन नंबरला थायलँड, रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया अशी स्थिती आहे.

Team Agrowon

Nashik News : साखर उद्योगात नव्याने बदल होत आहे. जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या उत्पादनामुळे भारत एक नंबरला, दोन नंबरला ब्राझील तीन नंबरला थायलँड, रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांमुळे ही किमया झालेली आहे. साखर उद्योगातील वार्षिक उलाढाल एक लाख कोटीवर आहे.

राज्यात गेल्या वर्षी ९८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती झाली. दरवर्षी वीस कोटी लिटर इथेनॉल वाढत जाऊन ही उलाढाल ८ हजार ७०० कोटी होणार आहे. या उद्योगातील वाढत्या संधी व भविष्य पाहता इतर पिके व ऊस उत्पादन खर्च लक्षात घेता पर्यायी पीक म्हणून उसाकडे बघायला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी येथे केले.

रावळगाव (ता. मालेगाव) साखर कारखाना एस. जे शुगर लिमिटेडकडून स्पायका ग्रीन एनर्जी अॅण्ड अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडने खरेदी केला आहे.

कारखान्याच्या नूतन प्रशासनाकडून साखर आयुक्त शेखर गायकवाड, न्यायाधीश तेजवंतसिंग संधू, अॅड. शिशिर हिरे, सेवाकर आयुक्त समरसिंग काले यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा व यंत्रसामग्री पूजन केले. प्रा. के. एन. अहिरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

श्री. गायकवाड म्हणाले, की राज्यात साखर कारखान्यांचे रँकिंग सुरू झाले. जो कारखाना वेळेवर पेमेंट करत नाही त्याला शेतकऱ्यांनी ऊस देऊ नये. गेल्या दोन वर्षात बंद पडलेले २४ कारखाने पुन्हा सुरू झाले. साखर कारखान्यात बायप्रॉडक्ट तयार होत आहे.

स्पायकाचे बबनराव गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. या वेळी ते म्हणाले, की शेतकऱ्यांना नवीन वाणाचे बेणे देणे, उच्च तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादन वाढ, शेतकऱ्यांच्या समन्वयातून वेळेवर ऊस तोड, काटा पेमेंट देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

या वेळी संचालक नानासाहेब आंबेकर, भगवान टिळेकर, अरुण गुरगुळे, चंद्रशेखर दातीर, शिवाजी कामठे, रवींद्र चरवड, संदीप हनमघर, सीताराम फुलसुंदर, महेश तुपे, संजय देशमुख, सुदर्शन दांगट, हरूण शेख, आदित्य कचरे, महेश पाटोदिया, शेखर पवार, निखिल पवार, शेखर पगार, पवन ठाकरे, अरुण देवरे, सरपंच प्रमोद निकम, मविप्र संचालक विजय पगार उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT