Orange growers deprived of help
Orange growers deprived of help 
ताज्या बातम्या

Orange Growers : संत्रा निर्यातीसाठी सवलतींची गरज

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर ः विदर्भातून संत्रा निर्यातीला (Orange Export) प्रोत्साहन मिळावे याकरिता पहिल्या टप्प्यात पणन मंडळाकडून निर्यात सुविधा (Export Facility) सवलतीत पुरविण्यात आल्या पाहिजे. त्यानंतर शेतकऱ्यांकडून निर्यात वाढल्यास हे अनुदान (Subsidy) किंवा सवलतींमध्ये कपातीचे धोरण असावे, अशा प्रकारची मांडणी महाऑरेंजसह (Mahaorange) निर्यातदार व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली.

संत्रा निर्यातीला प्रोत्साहन मिळावे याकरिता अभ्यासासाठी एका कंपनीची नियुक्‍ती पणन मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मॕग्नेट’ (महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क प्रोजेक्ट) प्रकल्पस्तरावरून करण्यात आली आहे. ही समिती संत्रा निर्यातीसंदर्भाने विविध घटकांशी चर्चा करून तसेच बाजाराच्या अभ्यासाअंती आपला अहवाल देणार आहे.

या अभ्यास समितीने महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, मनोज जवंजाळ, सुधीर जगताप, निर्यातदार प्रवीण वानखडे, ताजू खान, रमेश जिचकार यांच्याशी संवाद साधला. या वेळी श्रीधर ठाकरे यांनी विविध अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले. मुंबई ते नागपूर असा संत्रा कंटेनर पाठविण्याचा खर्च ७० हजार रुपयांचा खर्च होतो.

परिणामी, निर्यातीला खरंच चालना मिळावी, असे वाटत असेल तर कंटेनरची उपलब्धता अनुदानावर झाली पाहिजे. निर्यातीमध्ये ग्रेडिंग, कोटिंग आणि आकर्षक बॉक्‍स पॅकिंग या सर्व बाबींचे महत्त्व आहे. या सुविधा देखील सवलतीत किंवा पहिल्या टप्प्यात निःशुल्क मिळाल्या तर येत्या काळात त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढता राहील.

त्यामुळे निर्यातीला चालना मिळण्यास मदत होणार आहे. संत्र्याची मागणी असलेल्या नवीन देशांचा शोध घेणे, नवे निर्यातदार तयार करण्याकरिता देखील पणनस्तरावरुन प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

संत्रा निर्यातीला चालना मिळावी याकरिता मॕग्नेट प्रकल्पात एक कंपनी नेमली आहे. या कंपनीने संत्रा उत्पादनाशी संबंधित सात लाख टन उत्पादकता राज्याची आहे. त्यातील दोन लाख टन संत्राच बांगलादेशला निर्यात होतो.

आयातशुल्क वाढीमुळे त्यालाही मर्यादा आल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर निर्यातीला चालना मिळावी याकरिता पणन मंडळाने स्थापन केलेल्या अभ्यास समितीसमोर विविध मुद्दे मांडण्यात आले. परंतु त्याकरिता सुरुवातीला संत्रा प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर सवलती देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढल्यानंतर या सवलतींमध्ये कपात करता येईल.

- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT