Crop Damage Survey Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : पिकांच्या पंचनाम्यांसाठी पैसे मागितल्याच्या तक्रारी वाढल्या

चौकशी करण्याची आमदार लहू कानडेंची मागणी

Team Agrowon

नगर / श्रीरामपूर ः नेवासे पाठोपाठ आता खुडसरगाव (ता. राहुरी) येथे महसूल कर्मचाऱ्याने शेती पिकाच्या पंचनाम्यासाठी (Crop Damage Survey) पैसे मागितल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. याची दखल घेत आमदार लहू कानडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे पिकाच्या पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याचा प्रकार समोर आल्यानंतर याची तत्काळ दखल घेत संबंधित कृषी सहायक, ग्रामसेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. ही घटना ताजी असताना खुडसरगाव (ता. राहुरी) येथील अप्पासाहेब देठे, अभिमन्यू चव्हाण, किशोर देठे, प्रकाश थेवरकर आदी शेतकऱ्यांनी महसूलचे कर्मचारी पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करत असल्याची तक्रार आमदार लहू कानडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

त्यानुसार कानडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विधिमंडळातही यासंदर्भात आवाज उठविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यात पिकांच्या पंचनाम्यांसाठी पैसे मागितल्याच्या तक्रारींत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे ते काय कारवाई करतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

खुडसरगावातील शेतकऱ्यांनी पीक पंचनाम्यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. त्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.
- लहू कानडे, आमदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT