Agriculture Study Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Study : ‘ल्युकेनिया’च्या शिष्टमंडळाशी संवाद

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध शेतीपद्धतीचा अभ्यास व शेतीज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती पाहिल्यानंतर केनियातील ल्युकेनिया विद्यापीठाच्या (Lukenya University) शिष्टमंडळाने डॉ. भगवानराव कापसे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाशी संवाद साधला.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील विविध शेतीपद्धतीचा अभ्यास (Agriculture Study) व शेतीज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती पाहिल्यानंतर केनियातील ल्युकेनिया विद्यापीठाच्या (Lukenya University) शिष्टमंडळाने डॉ. भगवानराव कापसे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाशी संवाद साधला.

औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतीज्ञान जाणून घेण्यासाठी केनिया येथील ल्युकेनिया विद्यापीठाचे शिष्टमंडळ ५ व ६ डिसेंबरला मराठवाड्यात आले होते. या शिष्टमंडळात ल्युकेनिया विद्यापीठाचे कौन्सिल मेंबर सचिन शहा यांच्यासह कसांगा डेव्हिड दंबुकी, मुवेला सामी मुटावी यांचा समावेश होता.

औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील रेशीम उद्योग, कपाशी, मका इतर पीकपद्धतीच माहिती जाणून घेणाऱ्या ल्युकेनिया विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने पुढील काळात एकत्रितपणे काम करण्याच्या संधीवर डॉ. भगवानराव कापसे यांच्या नेतृत्वातील सहकाऱ्यांशी औरंगाबाद येथे संवाद साधला.

या संवादात रेशीम विभागाचे उपसंचालक दिलीप हाके, जवळपास १२ वर्षे केनियातील विविध भागांत शेती उद्योगाशी जोडून असलेले अशोक लडकत, डॉ. माने, डॉ. बैनाडे, विलास कापसे आदींनी सहभाग नोंदविला.

या संवादात श्रीा. शहा, डॉ. माने, डॉ. बैनाडे, श्री. लडकत, श्री. हाके यांनीही आपली मते मांडली. डॉ. कापसे व केनियन शिष्‌टमंडळाच्या प्रतिनिधींनी हे काम अवघड असले, तरी केनियातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी ते हाती घेणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. ल्युकेनिया विद्यापीठाच्या प्रमुखांसह इतर सहकाऱ्यांशी सविस्तर संवाद केल्यानंतर पुढील कार्याची दिशा ठरविली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT