Milk Rate Agrowon
ताज्या बातम्या

Milk Rate : दूधदर निश्‍चितीसाठी समिती

Cow Milk Price : शेतकऱ्यांच्या दुधाला किमान भाव मिळावा यासाठी दूधदर निश्‍चित करण्यासाठी दुग्ध व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.

Team Agrowon

Mumbai News : शेतकऱ्यांच्या दुधाला किमान भाव मिळावा यासाठी दूधदर निश्‍चित करण्यासाठी दुग्ध व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.

राज्यातील दूध उत्पादक, सहकारी व खासगी दूध संघ, पशुखाद्य उत्पादक कंपन्या आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुण्यात बैठक झाली होती.

या बैठकीत त्यांनी समिती नेमण्याचे आश्‍वासन दिले होते. या बैठकीत दूध उत्पादकांना खरेदीपोटी लिटरमागे किमान ३५ रुपये द्यावे लागतील, अशी सूचना केली होती. तसेच याबाबत फेरविचार होण्याची शक्यता नाही, असेही ते म्हणाले होते.

या वेळी दूध उद्योग प्रतिनिधींनी इतका दर देणे परवडणारे नसल्याचा मुद्दा मांडला. त्यामुळे यावर सर्व बाबींचा सर्वंकष विचार करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.

दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त या समितीचे अध्यक्ष असून, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळांचा प्रतिनिधी, सहकारी दूध संघाचा प्रतिनिधी यामध्ये जळगाव आणि वारणा दूध संघाचे प्रतिनिधी असतील तसेच चितळे डेअरी, इंदापूर डेअरी अँड मिल्क, ऊर्जा मिल्क अँड मिल्कचे प्रतिनिधी या समितीचे सदस्य असतील. दुग्ध व्यवसाय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त या समितीचे सदस्य सचिव असतील.

समितीची कार्यकक्षा

या समितीने दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला (३.५/ ८/ ५) व म्हशीच्या दुधाला (६.०/९.०) दिला जाणारा किमान दूधदर निश्‍चित करावा.

बैठकीत निश्‍चित होणाऱ्या दूधदरास दुग्ध व्यवसाय आयुक्तांनी सरकारची मान्यता घ्यावी लागणार आहे. या किमान दूधदरात कोणतीही कपात न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना देणे राज्यातील सर्व सहकारी व खासगी दूध संघांना बंधनकारक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Management: संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने पूर्णतः सज्ज राहावे : मित्तल

Shaktipeeth Highway Protest: प्रस्तावित ‘शक्तिपीठ’साठी इंचभरही जमीन देऊ नका: राजू शेट्टी

Chhatrapati Sambhajinagar DPDC Meeting: ‘डीपीडीसी’ बैठकीत ९०९ कोटींचा आराखडा मंजूर

Vidarbha Farmer Issues: सिंचनाच्या अभावामुळेच शेतकरी आत्महत्या

Fake Fertilizers Seeds Issue: बोगस बियाणे, खत काळाबाजार प्रकरणांत थेट गुन्हे दाखल करा : विखे पाटील

SCROLL FOR NEXT