Cooperative Election Agrowon
ताज्या बातम्या

Cooperative Election : सोलापूर जिल्ह्यात सहकार निवडणुकांचा धुरळा

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका ठप्प झाल्या असताना आता जिल्ह्याच्या राजकारणात सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे.

Team Agrowon

Cooperative Election सोलापूर : जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका (Election) ठप्प झाल्या असताना आता जिल्ह्याच्या राजकारणात सहकारी संस्थांच्या (Cooperative Organization) निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे.

बहुप्रतिक्षेत असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील चार सहकारी साखर कारखाने, दोन सहकारी सूतगिरण्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी १ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.

या संस्थांच्या निवडणुकांसाठी १ फेब्रुवारी २०२३ या अर्हतेवर मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दिल्या आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जाहीर झालेली प्रक्रिया थांबविण्यात आली होती. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आता पुन्हा एकदा प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये बँकेचे तत्कालीन चेअरमन राजन पाटील यांचे संचालक मंडळ बरखास्त करून या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती.

शिंदे-फडणवीस सरकार यामुळे बँकेची यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी

साखर कारखाना, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, मकाई सहकारी साखर कारखाना व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

या कारखान्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, शिवसेनेच्या नेत्या रश्‍मी बागल यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

या शिवाय माळशिरस तालुक्यातील हरणाई सहकारी सूतगिरणी व सांगोला तालुक्यातील शेतकरी महिला सूतगिरणीच्या संचालक मंडळाचीही निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

जून-जुलैमध्ये प्रत्यक्ष मतदानाची शक्यता...

राज्यातील अ वर्गातील ज्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांची मुदत संपते त्याच्या १५० दिवस अगोदर निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्यानुसार जिल्ह्यातील या सात सहकारी संस्थांसाठी १ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. या संस्थांसाठी जून-जुलैमध्ये प्रत्यक्षात मतदान होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीसाठी मतदार यादी महत्त्वाची असल्याने निवडणुकीत डाव-प्रतिडावांची सुरवात ही मतदार याद्यांपासूनच केली जात असल्याने ही प्रक्रिया कशी पार पाडते? यावरही बरेच काही अवलंबून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT