Cow Milk Rate agrowon
ताज्या बातम्या

Cow Milk Rate : धोरण दूध संस्थांचे मरण शेतकऱ्यांचे, राज्यातील अनेक दूध संस्थांकडून गाय दूध खरेदी दरात कपात

Milk Rate : म्हैस दूध उत्पादकांनाही प्रतिलिटर दी रुपयाची वाढ १ ऑक्टोबरपासून मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

sandeep Shirguppe

Milk Rate Kolhapur Sangli : मागच्या दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा दूध संघाने गायीच्या खरेदी दूध दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. यापाठोपाठ कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सहकारी व खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हैस दूध उत्पादकांनाही प्रतिलिटर दी रुपयाची वाढ १ ऑक्टोबरपासून मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या निर्णयाने शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.

यामध्ये गायीच्या दुधाला मागणी कमी असल्याने दरात प्रतिलिटर दोन रुपये कमी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. यावेळी राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील 'भारत' डेअरीचे किरीट मेहता, 'चितळे डेअरीचे श्रीपाद चितळे, 'थोटे' डेअरीचे शीतल थोटे, 'विराज' डेअरीचे विश्वास पाटील आदी उपस्थित होते.

गोकुळच्या निर्णयानंतर सर्वच संस्थांचा निर्णय

गोकुळने म्हैस दूध दरात प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ करुन दिलासा दिला. मात्र, गाय दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केल्यामुळे दूध उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली. करवीर, राधानगरी, गारगोटी तालुक्यातील गावांमध्ये कपात केलेले दर पुन्हा वाढवावेत, यासाठी आंदोलन करण्यात आले.

गोकुळकडून वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट्य आहे. यामध्ये गाय दूधाचे संकलनही महत्त्वाचे आहे. एकीकडे तरुणांनी दूध उत्पादन व्यवसाय करावा यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींकडून आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे दरात कपात झाल्यामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जात आहे. गायीसाठी चारा, औषधपाणी यासह इतर खर्च करताना मेटाकुटीला आलेल्या उत्पादकाला दर कपातीचा धक्का सहन होणार नसल्याची प्रतिक्रीया दूध उत्पादकांनी दिली.

तीन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात

गोकुळ दूध संघाने तीन महिन्यांत दोन वेळा गाय दूध दरात चार रुपये कपात केली आहे. याच्या निषेधार्थ बहिरेश्वर (ता. करवीर) येथील दूध उत्पादक शेतकन्यांनी सायंकाळी वेताळ चौकात घोषणाबाजी केली. आठ दिवसांत दरवाढ न केल्यास आमच्या दुधाची विल्हेवाट आम्ही लावू, असा इशाराच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळ दूध संघाला दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT